Gopichand Padalkar : अंबडमध्ये धनगर समाजाकडून बंद; पडळकरांनी शांततेचे आवाहन करूनही दगडफेक...

Dhangar Reservation : अंबडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा
Dhangar Community
Dhangar CommunitySarkarnama
Published on
Updated on

Jalna Ambad News : इंदापूर येथे धनगर नेते, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ धनगर समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पडळकरांनी शांततेचे आवाहन केले आहे. मात्र जालन्यातील अंबड येथे धनगर समाजाकडून आक्रमक भूमिका घेत अचानक बंद पुकारण्यात आला. परिणामी पडळकरांवर चप्पलफेकीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी चप्पलफेकीच्या घटना घडली होती. यानंतर रविवारी सकाळी अंबड शहरांमध्ये धनगर समाजाच्या वतीने अचानक बंद आवाहन करण्यात आले. बंदचे आवाहन केल्यानंतरही काही दुकाने सुरू होती. त्या दुकानांवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhangar Community
Gopichand Padalkar : इंदापुरातील घटनेनंतर पडळकरांचा इशारा; म्हणाले, 'त्यांच्या अंगावर कपडेही...'

अंबडमध्ये धनगर कार्यकर्त्यांकडून दुकान बंदचे आवाहन केले जात असताना काही हल्लडबाजांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफिकीचे घटनेने पुन्हा एकदा धनगर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, स्वतः पडळकांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले होते. तसेच चप्पलफेक करणाऱ्यांनाही इशारा दिला होता. नागपूर येथील अधिवेशनावर ११ डिसेंबर रोजी धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात राज्यातील धनगर समाजाला शांततेत सहभागी होण्याचेही आवाहन पडळकांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dhangar Community
Manoj Jarange: भुजबळांनी माझा धसका घेतलाय, सध्या झोपेतही ते बरळतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com