Haryana Election Result : हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसचा धुव्वा..; 'ही' आहेत महत्त्वाची 5 कारणं

Haryana Assembly Election Result Updates : कालपर्यंत हरियाणात काँग्रेसचं विजयी होणार असल्याचं बोललं जात होतं. असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलाच शिवाय विविध एक्झिट पोल्सनी देखील हरियाणामधील जनता काँग्रेसलाच कौल देणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
 Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi, Bhupinder Singh Hooda, Kumari Shailaja
Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi, Bhupinder Singh Hooda, Kumari ShailajaSarkarnama
Published on
Updated on

Haryana Assembly Election Result 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजप या राज्यात एकहाती सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे.

मात्र, कालपर्यंत हरियाणात काँग्रेसचं (Congress) विजयी होणार असल्याचं बोललं जात होतं. असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलाच शिवाय विविध एक्झिट पोल्सनी देखील हरियाणामधील जनता काँग्रेस पक्षाला कौल देणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसची उलटी गणती सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच भाजपने (BJP) जोरदार आघाडी घेत बहुमताचा आकडा देखील पार केला. त्यामुळे भाजप विजयाची हॅटट्रिक करणार हे निश्चित झालं आहे.

आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भारतीय जनता पक्ष 50 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीनुसार भाजप एकहाती सत्ता स्थापन करू शकतो. तर काँग्रेस 35 जागांवरच अडकल्याच पाहायला मिळत आहे. तर आधी काँग्रेस भाजपचा पराभव करेल असं वाटत असतानाच भाजपने जोरदार मुसंडी कशी मारली? आणि काँग्रेस पिछाडीवर राहण्याला कोणती कारणं कारणीभूत ठरली? याबाबत जाणकारांनी सांगितलेली माहिती जाणून घेऊया.

 Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi, Bhupinder Singh Hooda, Kumari Shailaja
BJP Politics : हरियाणातील निकालावरून बावनकुळेंनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभेचं गणित; म्हणाले, "महायुती सरकारला..."

हरियाणात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा हे निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत होते. तर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) इथे 12 सभा घेत विजय संकल्प यात्रा देखील काढली होती. काँग्रेसने या निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना आणि विनेश फोगाटसह इतर पैलवानांवर भाजपने कसा अन्याय केला हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले होते.

त्यानुसार, सैन्य भरतीमधील अग्निवीर योजनेच्या अंमलबजावणीला झालेला तीव्र विरोध. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर झालेलं कुस्तीपटूंचं आंदोलन आणि दिल्लीच्या सीमेवर जवळपास दीड वर्षे चाललेलं शेतकऱ्यांचं आंदोलनाचे मुद्दे पुढे करत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला होता. मात्र, यातील कशाचाही परिणाम निवडणुकीत झाला नसल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेसच्या पराभवाची नेमकी कारणं काय?

नेत्यांमधील वाद

या निवडणुकीत काँग्रेसची (Congress) पिछेहाट होण्याला प्रमुख कारण ठरलं ते माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यातील वाद. कुमारी शैलजा काँग्रेसमध्ये खूप लोकप्रिय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय या नेत्यांमधील संबंध खराब नाहीत. मात्र ते मुख्यमंत्रीपदासाठी स्वतंत्र दावे करत असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं होतं. मात्र, या दोघांमधील अशा उघड संघर्षामुळे पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची चर्चा आहे.

 Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi, Bhupinder Singh Hooda, Kumari Shailaja
Vinesh Phogat Won : बहिणीला जे जमलं नाही ते विनेशनं करून दाखवलं! विधानसभेत थाटात एन्ट्री

अनुसूचित मतदारांचा निर्णायक कौल

या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी 17 जागा राखीव आहेत. या जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. दुपारपर्यंतत्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार 17 पैकी 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर 8 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. मागील वेळी 4 राखीव जागा दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाकड तर एक जागा अपक्ष उमेदवाराच्या खात्यात गेली होती. मात्र, यावेळी जननायक जनता पक्ष एकाही जागेवर आपला करिष्मा दाखवू शकल नाही.

जाटांच्या विरोधात एकत्रिकरण

काँग्रेसने हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली जाट समुदायाच्या मतांवर डोळा ठेवला होता. तर भाजपने जाट वगळता इतर समाजांना एकत्र केले. भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याकडे तिकीट वाटपाची जबाबदारी होती आणि त्यांच्या सूचनेनुसार 72 तिकिटे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांनी जाट लॉबीच्या वर्चस्वाचा खतपानी दिल्याचा संदेश गेला आणि अहिरवाल पट्ट्यातील यादव, ब्राह्मणांसह कर्नाल, कुरुक्षेत्र, हिस्सार या भागातील इतर अनेक समाज काँग्रेसविरोधात गेले.

 Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi, Bhupinder Singh Hooda, Kumari Shailaja
Haryana Election Result 2024 : विरेंद्र सेहवागने ज्या उमेदवारासाठी हरियाणात 'बॅटिंग' केली, त्याचं काय झालं?

भाजपची मजबूत रणनीती

विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून भाजपने मोठी खेळी करत 6 महिन्यांपूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री बदलले. मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदावरून हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची सुत्र दिली. तसंच खट्टर यांना निवडणूक प्रचारापासून पूर्णपणे दूर ठेवलं. याद्वारे भाजपाने खट्टर यांच्यावरील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तर नव्या चेहऱ्याकडून नव्या अपेक्षा निर्माण झाल्यामुळेही मतदारांचा कौल भाजपकडे राहिला.

काँग्रेसचा ओव्हर कॉन्फिडन्स

तर काँग्रेस या निवडणुकीत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होती तर भाजपने मात्र सामाजिक समीकरण कायम ठवलं. गुरुग्राममध्ये प्रथमच ब्राह्मण उमेदवार तर महेंद्रगडमध्ये यादवांना संधी दिली. याशिवाय सैनी, गुर्जर, यादव समाजाच्या अनेक सभा झाल्या. असं करत भाजपने बिगर जाट ओबीसी समुदायांमध्ये एकत्रीकरण केल्याचा फायदा भाजपला या निवडणुकित झाल्याचं पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com