Nari Shakti Adhiniyam: विरोधकांचा मोठा विजय! 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयक नामंजूर; विधेयकाच्या बाजूनं अन् विरोधात किती मतं पडली? जाणून घ्या

Nari Shakti Adhiniyam: सभागृहात उपस्थित एकूण ५२८ खासदारांनी मतदान केलं. यांपैकी विधेयकाच्या बाजूनं २९८ मतं पडली तर विरोधात २३० मतं पडली.
Loksabha
Loksabha
Published on
Updated on

Nari Shakti Vandan Adhiniyam: संसदेच्या विशेष अधिवेशनात दोन दिवस जोरदार चर्चेनंतर अखेर नारी शक्ती वंदन अधिनियमावर मतदान पार पडलं. यासाठी ४८९ जणांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे मतदान केलं. तर २० खासदारांनी चिठ्ठीद्वारे मतदान केलं. यामध्ये विधेयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली मत न पडल्यानं हे विधेयक नामंजूर झालं आहे.

सभागृहात उपस्थित एकूण ५२८ खासदारांपैकी ४८७ खासदारांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे केलेल्या मतदानात या विधेयकाच्या बाजूनं २७८ मतं पडली तर विरोधात २११ मतं पडली. तसंच उर्वरित ४१ खासदारांनी चिठ्ठीद्वारे केलेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूनं २० मतं पडली तर विरोधात २१ मतं पडली. त्यानुसार, एकूण ५२८ मतांपैकी विधेयकाच्या बाजूनं २९८ मतं पडली तर विरोधात २३० मतं पडली. हे विधेयक पारीत होण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ३५२ मतं आवश्यक होती.

दरम्यान, मतदानाचा निकाल जाहीर करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक पास होऊ शकलेलं नाही. कारण यासाठी आवश्यक असणारं दोन तृतीयांश बहुमत सभागृहात मिळू शकलेली नाहीत.

Loksabha
Mamata Banerjee: निवडणूक रॅलीदरम्यान अचानक असं काही घडलं की CM ममता बॅनर्जींनी प्रचंड घाबरल्या; व्हिडिओ आला समोर

त्याचबरोबर या निकालामुळं सरकारवर घटनादुरुस्ती विधेयकासोबतच आणलेली इतर दोन विधेयक ही पटलावर मांडण्यापूर्वीच मागे घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर ओढवली आहे. त्यामुळं विशेष अधिवेशन बोलावून मतदारसंघ फेररचना करण्याचा घाट सरकारच्या अंगलट आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com