National Anthem New Rule : आता राष्ट्रगीतापूर्वी म्हणावे लागणार 'हे' गीत; सरकारने काढले नवे आदेश, पाहा नवा नियम काय सांगतो?

latest government rule on national anthem : अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी हे गीत सादर करण्याबाबत सरकारने नवा आदेश जारी केला आहे. नवीन नियम काय सांगतो आणि तो कुठे लागू होणार याची संपूर्ण माहिती वाचा.
National Anthem New Rule : आता राष्ट्रगीतापूर्वी म्हणावे लागणार 'हे' गीत; सरकारने काढले नवे आदेश, पाहा नवा नियम काय सांगतो?
Published on
Updated on

केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. या आदेशानुसार काही अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतासोबत वंदे मातरम् गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार जर राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत एकत्र सादर करायचे असतील, तर सर्वप्रथम वंदे मातरम् गायले जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत सादर केले जाईल.

'वंदे मातरम्' हे सहा कडव्यांचे गीत असून त्याची एकूण कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद इतका आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की गीत सादर होत असताना उपस्थित सर्वांनी उभे राहणे आवश्यक राहिल. या नियमांचे पालन सर्व शासकीय व अधिकृत कार्यक्रमांमध्ये काटेकोरपणे करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

National Anthem New Rule : आता राष्ट्रगीतापूर्वी म्हणावे लागणार 'हे' गीत; सरकारने काढले नवे आदेश, पाहा नवा नियम काय सांगतो?
Nirmala Nawale Video : धक्कादायक! पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना चक्क ड्रग्ज दिलं; राष्ट्रवादीच्या निर्मला नवलेंचा खळबळजनक आरोप!

'वंदे मातरम्' हे गीत सुरुवातीला स्वतंत्र रचनेच्या स्वरूपात तयार करण्यात आले होते. नंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 1882 साली प्रकाशित झालेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत त्याचा समावेश करण्यात आला. 1896 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच हे गीत गायले. 7 ऑगस्ट 1905 रोजी राजकीय घोषवाक्य म्हणून ‘वंदे मातरम्’चा पहिल्यांदा वापर करण्यात आला. पुढे 1950 साली संविधान सभेने या गीताला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली.

नव्या नियमांनुसार ध्वजारोहण समारंभ, राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी आणि प्रस्थानानंतर, तसेच राज्यपालांच्या आगमन व निरोपाच्या वेळी वंदे मातरम् गायले जाणे अनिवार्य असेल. पद्म पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित समारंभांमध्येही हे गीत सादर करणे आवश्यक राहील. सरकारने अशा कार्यक्रमांची सविस्तर यादीदेखील प्रसिद्ध केली आहे.

काय आहे 'वंदे मातरम' या गाण्याचा इतिहास?

इतिहासात वंदे मातरम् या घोषणेने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोव्हेंबर 1905 मध्ये बंगालमधील रंगपूर येथील एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांना वंदे मातरम् गायल्यामुळे प्रत्येकी 5 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याच काळात विभाजनाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांना हे गीत गाण्यापासून रोखण्यासाठी विशेष पोलीस म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.

National Anthem New Rule : आता राष्ट्रगीतापूर्वी म्हणावे लागणार 'हे' गीत; सरकारने काढले नवे आदेश, पाहा नवा नियम काय सांगतो?
India US Trade Deal : भारत-अमेरिका डीलमध्ये मोठा ट्विस्ट! अमेरिकेने गुपचूप बदलली 'फॅक्ट शीट'; काय आहे नेमकं प्रकरण?

नोव्हेंबर 1906 मध्ये महाराष्ट्रातील धुळे येथे झालेल्या मोठ्या सभेत वंदे मातरम् च्या घोषणा देण्यात आल्या. 1908 मध्ये कर्नाटकातील बेळगाव येथे लोकमान्य टिळकांना मंडाले (बर्मा) येथे पाठवण्यात येत असताना वंदे मातरम् गाण्यास बंदी असतानाही काही युवकांनी गीत गायले, त्यावेळी पोलिसांनी अनेकांना मारहाण करून अटक केली होती. नव्या आदेशामुळे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् अधिकृतरित्या आणि अनिवार्यपणे सादर केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com