Chief Minister Issue : मुख्यमंत्रिपदासाठी 500 कोटी द्या, खुर्ची मिळवा! काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या पत्नीने उडवून दिली खळबळ

Navjot Kaur Sidhu Statement: काँग्रेसला अडचणीत आणणारी विधाने पक्षाच्या नेत्याच्या पत्नीने केली आहेत. पक्षश्रेष्ठींना हे कधीच मान्य होणार नाही.
500 crore bribe claim
500 crore bribe claimSarkarnama
Published on
Updated on

Congress Internal Scandal 2025: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमधील दोन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच अन्य एका राज्यामध्येही मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील एका बड्या नेत्याच्या पत्नीने सीएम पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत, असे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पंजाबच्या राजकारणात नवज्योत सिंह सिध्दू हे मोठे नाव आहे. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पण २०२२ मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणापासून दूर गेले. सध्या ते राज्याच्या राजकारणात सक्रीय नाहीत. मात्र, २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिध्दू यांनी तसे संकेत दिले आहेत.

मागील महिन्यातच नवज्योत कौर यांनी पुन्हा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. तर आता त्यांनी आपल्या पतीला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनविल्यास ते राजकारणात पुन्हा सक्रीय होतील, अशी अटच काँग्रेसला घातली आहे. एवढेच नाही तर त्यांनी काँग्रेसमधील नेत्यांमधील वादावरही बोट ठेवले आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये कमीत कमी पाच नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. ते नवज्योत सिध्दू यांना पुढे जाण्याची संधी मिळू देणार नाही. त्यानंतरही काँग्रेस सिध्दू यांना संधी देत असेल तर ते पुन्हा राजकारणात परततील. अन्यथा ते बाहेर खूष आहेत. त्यांची चांगली कमाई होत आहे, असे सांगत त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत.

500 crore bribe claim
Maharashtra Assembly Session : ठाकरे देणार भास्कर जाधवांना धक्का? अधिवेशन सुरू होण्याआधीच सामंतांकडून गौप्यस्फोट

सिध्दू यांच्या पत्नीने म्हटले की, आपल्याकडे कोणत्या पक्षाला देण्यासाठी पैसे नाहीत. पण आपण पंजाबला एक सोनेरी राज्य बनवू शकतो. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी देण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाही. जे ५०० कोटी देतात, देच मुख्यमंत्री बनतात, असा आरोप करत नवज्योत कौर सिध्दू यांनी पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

500 crore bribe claim
Election Commission update : हायप्रोफाईल निवडणुकीत आयोगाची प्रतिष्ठा पणाला; आता 'करून दाखवावंच' लागणार...

दरम्यान, त्यांच्या या विधानावरून सिध्दू यांच्या अडचणी वाढविल्याची चर्चा आहे. पंजाबमधील नेत्यांनी त्यांची ही विधाने पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहेत. काँग्रेसला अडचणीत आणणारी विधाने त्यांनी केली आहेत. पक्षश्रेष्ठींना हे कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसमधील सिध्दू यांच्या सक्रीय होण्याची वाट अधिकच बिकट बनल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com