Maharashtra Assembly Session : ठाकरे देणार भास्कर जाधवांना धक्का? अधिवेशन सुरू होण्याआधीच सामंतांकडून गौप्यस्फोट

Opposition Leader post Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेतेपदाबाबत अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, असे म्हटले होते.
Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Uddhav Thackeray-Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics update : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना अधिवेशन पार पडणार आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधाऱ्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींकडे बोट दाखविले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदासाठी काही नेत्यांनी फिल्डींगही लावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक २० आमदार असल्याने त्यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद असेल, यात महाविकास आघाडीत दुमत नाही. ठाकरेंकडून ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा होती. तसे पत्रही देण्यात आले होते.

अजूनही भास्कर जाधव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. काल पत्रकार परिषदेतही त्यांनी अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा मांडला होता. आज मात्र मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भास्कर जाधव हे आक्रमक नेते आहेत, हे त्यांनी मान्य केले. मात्र, विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव नव्हे तर दुसऱ्याच नेत्याची महाविकास आघाडीत चर्चा सुरू असल्याचा बॉम्ब सामंतांनी टाकला. केवळ आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी हे पत्र दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदेंनी माफी मागावी..., रोहित पवार संतापले; म्हणाले, 'चुकीचंच नाही तर अनादर...'

उदय सामंत यांनी एकप्रकारे भास्कर जाधव यांना डिवचत महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचे काम केल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ सभापती राम शिंदे यांची भेट घेणार आहे. या पदासाठी सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दावने यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा मार्ग करणार मोकळा; 125 जागांच्या प्रस्तावाने भाजपची कोंडी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेतेपदाबाबत अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, असे म्हटले होते. त्यामुळे आता संपूर्ण लक्ष राहुल नार्वेकर आणि राम शिंदे यांच्या निर्णयाकडे असणार आहे. अधिवेशन सुरू होताच हा मुद्दा विरोधकांकडून दोन्ही सभागृहात उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्यांविना होणारे हे पहिले अधिवेशन ठरणार असल्याने याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com