Navneet Rana Case : नवनीत राणांना वादग्रस्त वक्तव्य भोवणार; हैदराबादेत गुन्हा दाखल...

Lok Sabha Election 2024 : ओवेसी बंधूंविरोधात केलेले प्रक्षोभक वक्यव्य भोवणार
Navneet Rana Case
Navneet Rana Case Sarkarnama

Amaravati News : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पंधरा मिनिटे विरुद्ध पंधरा सेकंद हा वाद आता पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. काँग्रेसला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देणे, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. या त्यांच्या वक्तव्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

नवनीत राणा य़ांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. काल त्यांनी हैदराबादेत जाऊन भाषण केले होते. या भाषणात त्यांनी 15 सेकंदाच्या वक्तव्याने खासदार असदउद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले होते. सोबतच काँग्रेस पक्षाबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. या संदर्भात आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana Case
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं
Navneet Rana Case
Dharashiv Loksabha Constituency : हक्काचा खासदार निवडून द्या; विकासापासून कोणी रोखू शकणार नाही.. राणा पाटलांची गॅरंटी..

काय म्हणाल्या होत्या राणा?

हैदराबादेत जाऊन ओवेसी बंधूंना ललकारताना राणा (Navneet Rana) म्हणाल्या होत्या की,"15 मिनिटे पोलिस हटवा आम्ही काय आहे ते सांगतो, असे तुम्ही म्हणालात. पण तुम्ही 15 मिनिटेच काय, फक्त 15 सेकंद पोलीस हटवा तुम्ही कोठे होता, कुठे गायब झाले, तुम्हाला कळणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com