Dharashiv Loksabha Constituency : हक्काचा खासदार निवडून द्या; विकासापासून कोणी रोखू शकणार नाही.. राणा पाटलांची गॅरंटी..

Rana Patil लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी राणा पाटील यांनी औसा तालुक्यातील उजनी येथे आठवडी बाजारात पदयात्रा काढत व्यापारी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
Rana Patil In rally
Rana Patil In rallysarkarnama

Dharashiv News : केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. मतदारसंघात विकास कामासाठी निधीचा ओघ आणायचा असले तर, आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या. मग आपल्याला कोणी रोखू शकणार नाही, असे आवाहन करत आमदार राणाजगजीतसिंह पाटील मतदारांना विकासाची गॅरंटी देत आहेत.

लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी राणा पाटील यांनी औसा तालुक्यातील उजनी येथे आठवडी बाजारात पदयात्रा काढत व्यापारी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे.

तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तेव्हा येत्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पाटील यांनी केले. पदयात्रेपुर्वी त्यांनी बाणगंगा साखर कारखाना येथे भेट देऊन कर्मचारी व गावकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून आपल्या लोकसभा क्षेत्रात त्याच विचारांचा खासदार असल्यास विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Rana Patil In rally
Dharashiv Loksabha Constituency : प्रफुल्ल पटेलांना झाली पद्मसिंह पाटलांची आठवण; अन् थेट घरी जाऊन घेतली भेट...

धाराशिवमध्ये महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे. अर्चना पाटील यांच्यासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिव मध्ये सभा घेतली होती. येत्या 7 मे रोजी धाराशिव मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यात घडलेल्या घडामोडी आणि शिवसेना, राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतरची ही पहिली निवडणूक आहे. ठाकरे गटाने ओमराजे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर महायुतीने तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मैदानात उतरवले आहे. प्रचारात दोन्ही बाजूने ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि आव्हान प्रतिआव्हान सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rana Patil In rally
Dharashiv Lok Sabha News : तुळजापूर मुक्कामी शरद पवारांचा प्लॅन ठरला; 'या' नेत्याने घेतली गुप्तभेट?

महायुतीने धाराशिवची जागा प्रतिष्ठेची केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. महायुती असल्यामुळे राणा पाटील यांनी प्रचारात झोकून देत आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील धाराशिव लोकसभा मतदारसंघावर आणि येथील प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील लक्ष्यवेधी लढती मध्ये एक धाराशिव असणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Rana Patil In rally
Dharashiv BJP Politics : जिल्हाध्यक्षांची निवड होऊन तीन महिने झाले, पण कार्यकारिणी ठरेना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com