Haryana Oath Ceremony : भाजपचे ओबीसी कार्ड; मंत्रिमंडळात साधले जातीय समीकरण, किती दलितांना स्थान?

CM Nayab Singh Saini OBC Dalit in Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गुरुवारी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Nayab Singh Saini new CM
Nayab Singh Saini new CMSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh News : हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यानंतर शुक्रवारी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. नायब सिंह सैनी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 13 अन्य नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सैनी यांच्या मंत्रिमंडळामध्ये जातीय समीकरण साधण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सैनी यांचा शपथविधी झाला. सैनी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढण्यात आली होती. त्यात मोठे यश मिळाल्याने पुन्हा सैनी यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे.

Nayab Singh Saini new CM
Justice Sanjiv Khanna : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले; कलम 370, निवडणूक रोख्यांसह अनेक महत्वाच्या केसचा दिलाय निकाल

असे साधले जातीय गणित

मंत्रिमंडळात ओबीसींना झुकते माप देण्यात आले आहे. सैनी हे स्वत: ओबीसी आहेत. तसेच राव नरबीर सिंह, आरती राव, रणबीर सिंह गंगवा आणि राजेश नागर या ओबीसी नेत्यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. गौरव गौतम आणि अरविंद शर्मा हे ब्राम्हण नेते मंत्रिमंडळात असतील.

मंत्रिमंडळात दोन दलित आमदारांना स्थान देण्यात आले आहे. कृष्ण लाल पंवार आणि कृष्ण कुमार बेदी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर जाट समाजातील श्रृती चौधरी आणि महिपाल ढांडा हे मंत्री असतील. पंजाबी वर्गातील अनिल विज, राजपूत चेहरा म्हणून श्याम सिंह राणा आणि बनिया समाजातील विपुल गोयल यांनाही मंत्री बनवण्यात आले आहे.

Nayab Singh Saini new CM
Akhilesh Yadav : अखिलेश यादव महाराष्ट्रात येऊन ‘एक घाव दोन तुकडे’ करणार; चेंडू ‘मविआ’च्या कोर्टात

सैनी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह पाच ओबीसी मंत्री असतील. या माध्यमातून भाजपने देशभरात संदेश दिला आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असताना हरियाणात जातीय समीकरण साधत भाजपकडून ओबीसी व इतर समाजाला जवळ आणण्याची संधी साधल्याचे बोलले जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com