Supreme Court On NCP Dispute : सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीला दणका; पुढील 36 तासांत 'ती' जाहिरात द्या!

Supreme Court orders NCP to publish advertisement: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टाच्या सुचनांचे उल्लंघन केले जात असल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar, Supreme Court
Sharad Pawar, Ajit Pawar, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महत्वाचे आदेश दिले आहेत. पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिराती पुढील 36 तासांत वृत्तपत्रात प्रसिध्द कराव्यात, असे कोर्टाने म्हटले आहे.

अजित पवारांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ बलबीर सिंह यांनी कोर्टाच्या सुचनांचे पालन करण्याची हमी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपांकर दत्ता आणि उज्जल भुइयां यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. शरद पवार यांच्याकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह निवडणुकीत वापरण्यापासून रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar, Supreme Court
Raj Thackeray : लाडकी बहीण म्हणता...मग लाडके भाऊ काय मेले काय?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कोर्टाने यापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाला प्रचार साहित्यामध्ये पक्ष आणि चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करावे, असे आदेश दिले होते. मागील महिन्यांत झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने या सुचनांचे पालन करू, असे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यास सांगितले होते.

बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बलबीर सिंह यांनी दावा केला की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टाने चिन्हाबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करत आहे. तसेच पक्षाने याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी वृत्तपत्रांशी संपर्कही साधला आहे.’ त्यावर कोर्टाने किती तासांत जाहिरात प्रकाशित करणार, असा प्रश्न केला. सिंह यांनी दोन-तीन दिवस असे उत्तर देताच न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 24 तास किंवा जास्तीत जास्त 36 तासांत जाहिरात प्रसिध्द करा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar, Supreme Court
Anil Deshmukh : 'महायुतीतून नाही तर अजितदादा स्वबळावर लढणार', शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने वर्तवला अंदाज

शरद पवारांच्या वतीने विधिज्ञ प्रांजल अग्रवाल यांनी बाजू मांडली. अजित पवारांच्या पक्षाकडून सोशल मीडियात कोणत्याही जाहिरातीशिवाय अपलोड केलेले व्हिडिओ हटवून पुरावे नष्ट करत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. ते खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, कोर्टाने अजित पवारांना निवडणुकीदरम्यान घड्याळ या चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात हे चिन्ह वापरता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com