Raj Thackeray : लाडकी बहीण म्हणता...मग लाडके भाऊ काय मेले काय?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Raj Thackeray On Ladki Bahin Yojna: चार राजकीय पक्षांना तुम्ही आलटून पालटून सत्ता दिला आहे. आता मनसेला सत्ता देऊन बघा. पण आजार नीट करण्यासाठी तुम्हाला मनसेचा प्रयोग करायलाच हवा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 November : लाडक्या बहिणीच्या नावाखाली पैसे द्यायचे आणि महागाईच्या नावाखाली दुप्पट वसूल करायचे, हे असले धंदे सध्या महाराष्ट्रात चालले आहेत अन सांगायचे आमची लाडकी बहिण आहे. मग लाडके भाऊ काय मेले काय? या असल्या लाेकांच्या नादी लागू नका. राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एकदा संधी देऊन बघा. एवढ्या वर्षांचे प्रश्न पाच वर्षांत सुटतील असे नाही. पण, आमची कामे पाहून तुम्हीच पुढची पाच वर्षांची सत्ताही पुन्हा मनसेकडे द्याल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यात राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभेत बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजन आणि महागाईवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, तुमचा आशीर्वाद आमचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना मिळावेत, यासाठी मी आले आहे. दुष्काळग्रस्त म्हणून मंगळवेढ्याची (Mangalvedha) ओळख आहे. एवढ्या निवडणुका झाल्या पण मंगळवेढ्याचा दुष्काळ काही हटलेला नाही. याच्याइतकी लाजीरवाणी गोष्ट नाही. आतापर्यंत ज्यांना निवडून दिलं. त्यांनी आपला तालुका अजूनपर्यंत दुष्काळग्रस्त कसा ठेवला, हे त्यांना विचारलं पााहिजे. पण त्या लोकांना प्रश्न विचारण्याची हिम्मत तुमच्यात नाही. त्यामुळेच तुमची ही हालत आहे.

Raj Thackeray
Pandharpur Constituency : पंढरपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार का?; धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा खुलासा

मंगळवेढ्यातील लोकं रोजगारसाठी पुणे-मुंबईला जात आहेत. त्यांना इथे थांबायला वेळ नाही. इतकी वर्षे तुम्ही अनेकांना खासदार, आमदार म्हणून निवडून दिलं आहे. एवढ्या लोकांना निवडून दिल्यानंतरही येथील तरुणांना रोजगारारासाठी पुणे-मुंबईला जाव लागतं, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पण, माझ्याकडे सत्ता दिला तर मी तुम्हाला तुमच्या भागात रोजगार देईन आणि हे सहज शक्य आहे, असा दावाही राज यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले, तुम्ही निवडून दिलेले बरेचसे आमदार, खासदार पुणे मुंबईत राहतात. ते फक्त तुम्हाला चेहरे दाखवण्यासाठी या भागात येतात. उद्योग तुमच्या भागात आले पाहिजेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. महिला, मुलींना पळविले जात आहेत. बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. त्याचं तुम्ही निवडून दिलेल्या लोकांनाही काहीही पडलेलं नाही. माझ्या हातात सत्ता देऊन बघा. महाराष्ट्र कसा वठणीवर येत नाहीत, हे मी बघतो. विद्यमान आमदार, खासदारांना तशी इच्छाच नाही. कारण काहीही न करता तुम्ही त्यांना निवडून देत आहात.

गेली साठ वर्षांपासून वीज, पाणी, रस्ते याच मुद्यावर निवडणुका होत आहेत. मी १९९० पासून राजकारणात आहे. हेच लोक आलटून पालटून सत्तेवर येत आहेत. पण काहीही प्रश्न सुटलेले नाहीत. मी २०१४ मध्ये राजकीय आराखडा काढला. भारताच्या इतिहासात एकमेव मनसेने राजकीय आराखडा मांडलेला आहे. तुम्ही कधीही वेगळा प्रयोग केलेला नाही. चार राजकीय पक्षांना तुम्ही आलटून पालटून सत्ता दिला आहे. आता मनसेला सत्ता देऊन बघा. पण आजार नीट करण्यासाठी तुम्हाला मनसेचा प्रयोग करायलाच हवा, असे आवाहन ठाकरेंनी केले.

Raj Thackeray
Chitra Wagh : ‘बंटीभाऊ, तुमची घंटी कोणी वाजवली, ते अगोदर शोधा’: कोल्हापूरच्या घटनेवरून चित्रा वाघांचा पाटलांना टोला

जगात अशक्य काहीच नाही

जगात अशक्य काहीच नाही. महाराष्ट्र मोठा आहे. पण या लोकांमुळे त्याला पुढे जाऊ दिलं गेलं नाही. या लोकांच्या स्वार्थापायी हे घोडं अडलं आहे. या लोकांचे गुलाम राहू नका. खरं ते तुमचे गुलाम आहेत. पुन्हा त्याच त्याच लोकांना निवडून देऊ नका. मनसे तुमच्यापुढे एक उत्तम पर्याय आहे. त्यांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com