Sandipan Bhumre : 'मी नाराज नाही, खासदार झालो यातच मला समाधान' ; मंत्रीपद हुकल्यानंतर भुमरेंचं विधान!

Shivsena MP Sandipan Bhumre ...त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांना राज्यमंत्री पद मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती.
Sandipan Bhumre
Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार सत्तेवर आले. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ काही तासांनी घेणार आहे. या सरकारमध्ये मराठवाड्यातील लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांची मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shidne) यांनी भुमरे यांच्याऐवजी विदर्भाच्या बुलडाणा मदारसंघातून निवडून आलेल्या अनुभवी प्रताप जाधव यांच्या नावाला पसंती दर्शवली. मात्र मी नाराज नाही, मी खासदार झालो यातच मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया खासदार भुमरे यांनी मंत्रीपदावर विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना दिली.

Sandipan Bhumre
Marathwada Political News : मोदी सरकार 3.0 मधून मराठवाडा आऊट.. भुमरेंना संधी नाही, कराडांना वगळले !

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असून मलाही तो मान्य असल्याचे भुमरे म्हणाले. पैठण विधानसभा मतदारसंघातून भुमरे(Sandipan Bhumre) सहा वेळा लढले. पैकी पाच वेळा त्यांनी विजय मिळवला. राज्यातील महाविकास आघाडी आणि त्यानंतरच्या महायुती सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्याचा पदभार त्यांच्याकडे होता. याशिवाय छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून ते काम पाहत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना लोकसभेसाठी संभाजीनगरमधून लढण्याची गळ घातली. मुलाला पैठणमधून विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द घेऊन त्यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली. पहिल्याच प्रयत्नात भुमरे 1 लाख 35 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. मराठवाड्यातील महायुतीचे निवडून आलेले ते ऐकमेव खासदार ठरले. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांना राज्यमंत्री पद मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती.

Sandipan Bhumre
Jalna Lok Sabha 2024 Analysis: सत्तार-भुमरे यांच्याकडूनही रावसाहेब दानवेंचा 'करेक्ट' कार्यक्रम..

कालपासून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आज शिवसेना(Shivsena) शिंदे गटाकडून एकमेव प्रताप जाधव यांचे नाव मंत्रीपदासाठी देण्यात आले. त्यामुळे राज्यातील मंत्री, पालकमंत्री पद सोडून दिल्लीत प्रमोशनवर गेलेल्या भुमरे यांचे तसे पाहिले तर नुकसानच झाले, अशी चर्चा होत आहे. मात्र भुमरे स्वतः मात्र समाधानी आहेत, आपल्या मंत्रीपदाची अपेक्षा नव्हती, मी खासदार झालो, माझ्यासाठी एवढेच खूप आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com