Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी निर्मला सीतारामनांना सुनावले खडेबोल

Parliament Winter Session : सामाजिक न्याय विभागाला निधी का देत नाही'," असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी निर्मला सीतारामनांना सुनावले खडेबोल
Published on
Updated on

Parliament Winter Session : लोकसभेत हिवााळी अधिवेशनात लेखानुदान वरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वयोश्री योजनेसह अन्य मुद्दे उपस्थित केले. या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने केलेल्या कामाची प्रशंसा सत्ताधारी बाकावरुन करण्यात आली‌. या भाषणांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात केलेल्या कामाचा खासदार सुळे यांनी उल्लेख केला.

"वयोश्री योजनेत सर्वात चांगले काम बारामती मतदारसंघात झाले आहे. या वर्षी एक लाखहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. तथापि आणखी काम करण्यासाठी आम्ही सामाजिक विभागाकडे निधी मागितला तर आम्हाला निधी नाही, असे सांगितले जाते. जर तुम्ही तुम्ही खत, तेल, नरेगा,फळविमाला निधी मागू शकता तर सामाजिक न्याय विभागाला निधी का देत नाही'," असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

वयोश्री योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यात पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. संपूर्ण मतदार संघातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असे एकूण एक लाख जणांची तपासणी पूर्ण झाली असून त्यांना आता वयोश्री योजनेतील उपयुक्त साधनांचे वाटप करायचे आहे. या लाभार्थ्यांकडून विचारणा होत आहे. या साधनांच्या खरेदीसाठी निधीच नसल्याचे सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात येत आहे.

खासदार सुप्रिया सुळे या गेले सहा महिने निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत, मात्र सरकारकडून त्यांना कोणतेही सहकार्य केले जात नाही, या पार्श्वभूमीवर त्या लोकसभेत बोलत होत्या.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी निर्मला सीतारामनांना सुनावले खडेबोल
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या कन्येवर प्राणघातक हल्ला

संसदेत सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. विरोधकांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यनाचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "संसदेतील काही लोक देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळत आहेत. भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र विरोधकांना यामुळे त्रास होतोय," सीतारामन यांना सुप्रिया सुळेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आम्ही का जळू

"अर्थमंत्र्याचे कालचे विधान ऐकून धक्का बसला. त्या म्हणाल्या, भारताच्या चांगल्या अर्थव्यवस्थेवर काही जण जळत आहेत. जर देश चांगला चालला तर आमच्या मतदारसंघाचा विकास होणार आहे. त्यामुळे आम्ही का जळू, उलट यावर सरकारने बोलावे आणि डाँलरवर आपली भूमिका स्पष्ट करावी," असे आवाहनही सुळे यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com