सुप्रिया सुळेंसह गावित, बारणे ठरले संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
Heena Gavit, Supriya Sule, Shrirang Barne
Heena Gavit, Supriya Sule, Shrirang BarneSarkarnama

नवी दिल्ली : संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने संसदरत्न पुरस्कार (Sansad Ratna Award 2022) देऊन गौरविण्यात येते. यावर्षी देशातील ११ खासदारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे.

सुप्रिया सुळे या सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्यासोबत यावर्षी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), भाजपच्या खासदार हीना गावित (Heena Gavit) आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान (Fauzia Khan) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एकूण अकरा खासदारांमधे आठ लोकसभेचे तर तीन राज्यसभेचे सदस्य असल्याचे फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे.

Heena Gavit, Supriya Sule, Shrirang Barne
जयंतरावांनी भाजप नेत्याला पक्षप्रवेशासाठी पाच तास वाट बघायला लावली!

सुप्रिया सुळे, रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे यांना संसद विशिष्ट रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संसदीय कामकाजात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचेही खासदार विद्युत बरान महातो, हीना गावित व सुधीर गुप्ता यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जाईल. सतराव्या लोकसभेतील उत्कृष्ट कामासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक आणि राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांची सध्याचे सदस्य या गटातून २०२१ मधील कामगिरीच्या आधारावर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर कम्युनिट पार्टीचे (मार्क्सवादी) खासदार के. के. रागेश यांची निवृत्त सदस्य २०२१ या गटातून निवड करण्यात आली आहे.

Heena Gavit, Supriya Sule, Shrirang Barne
"राजन पाटलांचं महत्व कमी होणार नाही" : जयंत पाटलांनी दिला शब्द

फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, सतरावी लोकसभा सुरू झाल्यापासून २०२१ मध्ये हिवाळी अधिवेशनापर्यंतच्या कामाची दखल या पुरस्कारांसाठी घेण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष के. श्रीनिवासन यांनी दिली. संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि उपाध्यक्षपदी माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती होते.

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सुचनेनुसार हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या खासदारांचा गौरव करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. २०१० मध्ये चेन्नईत पहिला पुरस्कार सोहळा पार पडला. आतापर्यंत ७५ खासदारांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com