Narendra Modi : ईव्हीएम जिवंत आहे का? मेलं, मोदींचा विरोधकांना टोला 

NDA Meeting PM Narendra Modi : या निवडणुकीत विरोधी पक्षाला चागल्या जागा मिळाल्या असून यावेळी कोणत्याहि विरोधी पक्षाच्या नेत्याने ईव्हीएम वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत ईव्हीएम जिवंत आहे का ? मेलं असा सवाल केला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi   : गेल्या काही निवडणुकीत विरोधकांकडून ईव्हीएम वर प्रश्न चिन्ह व्यक्त करण्यात येत होती. भाजप ईव्हीएम मध्ये फेरफार करून निवडणूक जिकंत असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र या निवडणुकीत विरोधी पक्षाला चागल्या जागा मिळाल्या असून यावेळी कोणत्याहि विरोधी पक्षाच्या नेत्याने ईव्हीएम वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत ईव्हीएम जिवंत आहे का ? मेलं  असा सवाल केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत भाषण करता एनडीएने मिळवलेल्या लोकसभा निवडणुकीचे गुणगान केले. मोदी म्हणाले, गरिबांचे कल्याण हे आमच्या साठी महत्वाचे असून गेल्या १० वर्षात गरिबांचे सरकार काय असते हे जनतेने अनुभवले आहे. पुढील १० वर्षात हे एनडीए सरकार देशाचा विकास, आणि नागरिकांचे जीवनमान सुधरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आमचे सरकार गुड गव्हर्नन्स अधिक प्रभावीपणे राबवून देशाला विकसित भारताकडे नेहणार आहे. एनडीए मधील लहान मोठा पक्ष आमच्यासाठी एक सामान असणार आहे. या भावनेमुळेच गेल्या १० वर्षात एनडीए एकत्र आहे. एनडीएतील सर्व पक्षाचे सदस्य एकसमान आहेत. 

लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात एक नवीन राजकारणाला सुरवात झाली आहे.   कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकाणी एनडीएला  बहुमत मिळाले आहे.  तामिळनाडू याठिकाणी एनडीएचा मतांचा टक्का वाढला आहे. यामुळे भविष्यात या ठिकाणी एनडीएला  मोठे यश आपल्याला मिळणार आहे. दक्षिण भारतात भाजपवर लोकांनी विश्वास दाखवला आहे.सिक्कीम ,अरुणाचल येथे मोठ्या बहुमत घेऊन आम्ही सरकार बनवत आलो आहे.  एनडीएला आंध्र प्रदेश मध्ये मोठे यशजनतेने दिले आहे.  

विरोधकांकडून निवडणूक काळात सातत्याने ईव्हीएम बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत होते. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, सध्या ईव्हीएम जिवंत आहे का? मेले, यावेळी  ईव्हीएमची विरोधक अर्थी काढतील असं वाटत होत. मात्र ४ तारखे नंतर त्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. आता विरोधक पुढील पाच वर्ष  ईव्हीएम बाबत बोलताना मिळणार नाही. पण २०२९ मध्ये पुन्हा हे ईव्हीएम बाबत बोलतील आणि ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतील अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली . 

लोकसभा निकाल हा एनडीएचा महाविजय आहे. मात्र गेल्या काही दिवस विरोधक आम्ही हरलो असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यासाठी करत आहे. परंतु आम्ही नाही हरवलो हा आमचा महाविजय असल्याचा मोदी यांनी सांगितले.  

PM Narendra Modi
PM Narendra Modi : मोदींनी खासदारांसमोर सांगितला ‘एनडीए’चा नवा अर्थ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com