Nehru Memorial Name Changed : नेहरू लायब्रेरीचं नामांतर : 'सरकारची कोत्या मनोवृत्तीचं लक्षण'; काँग्रसचा हल्लाबोल!

Nehru Memorial Library Delhi Name Changed : "नेहरूंच्या स्मृती नष्ट होऊ शकत नाहीत, हे या सरकारने लक्षात ठेवावे."
Nehru Memorial Name Changed
Nehru Memorial Name Changed Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : केंद्र सरकारने दिल्ली येथील नेहरू मेमोरियल लायब्ररी आणि म्युझियमचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ही लायब्रेरी पंतप्रधान लायब्ररी आणि म्युझियम सोसायटी म्हणून ओळखलं जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत हा निर्णय म्हणजे मोदी सरकारचं कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे, असे म्हणत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश म्हणाले, "नामांतर करण्याचा हा बदल हा संकुचित वृत्ती आणि सूडाच्या राजकारणाचा परिणाम आहे. गेल्या ५९ वर्षांपासून नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी हे जागतिक बुद्धीजीवींचं महत्त्वाचं स्थान आणि पुस्तकांचा अनमोल असा खजिना आहे.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, "भारताच्या शिल्पकाराचे नाव आणि वारसा विकृत, अपमानित आणि नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी काय करणार नाहीत? मोदी हे असुरक्षिततेने दबलेले आहेत." यापूर्वी तीन मूर्ती स्मारकाचे नाव बदलून पंतप्रधानांचे संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आले होते. हा निर्णय 2016 मध्ये घेण्यात आला होता आणि आता पुन्हा असाच निर्णय आता घेण्यात आले आहे.

Nehru Memorial Name Changed
Bacchu Kadu News : तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली? आजोबांनी बच्चू कडूंना रस्त्यातच सुनावलं

देशाचा इतिहास बदलू पाहणाऱ्या आरएसएसचा हा अजेंडा असल्याचे सांगत काँग्रेसशिवाय सीपीआयचे डी. राजा यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, "देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही योगदान नव्हते. हे भारतीय जनतेला माहीत आहे. देशाचा नवा इतिहास लिहिण्याचा आणि स्वत:चा अजेंडा घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आधुनिक भारताच्या उभारणीत आरएसएसचे कोणतेही योगदान नव्हते. नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांनी नियोजन आयोगाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय संस्थांच्या विकासात योगदान दिले.

Nehru Memorial Name Changed
Akola Prahar News : प्रहारच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघातच फूट, बच्चू कडूंना मोठा धक्का !

आरजेडी नेते मनोज झा म्हणाले की, "पंतप्रधानपदासाठी नेहरू हे महात्मा गांधी यांची निवड होते. ते हिंदचे भूषण आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते. नेहरूंच्या स्मृती नष्ट होऊ शकत नाहीत, हे या सरकारने लक्षात ठेवावे. नेहरू आज जगात नाहीत, पण आजही हे सरकार त्यांच्या लोकशाही मूल्यांना घाबरत आहे. केंद्र सरकार नेहरूंच्या विचारांकडे संसदीय लोकशाहीचे तारणहार म्हणून पाहते. त्यामुळे तिला त्यांच्याकडून धोका वाटतो," असे मनोज झा म्हणाले. (Nehru Memorial Library Delhi Name Changed)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com