Nehru Memorial Name Change: नेहरू मेमोरियलच्या नामांतरावर शिक्कामोर्तब ; आता 'पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय' नावाने मिळणार ओळख

Pandit Jawaharlal Nehru Memorial News: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्यानंतर अधिकृत निवासस्थान किशोर मूर्ती भवन होते.
Nehru Memorial Name Change :
Nehru Memorial Name Change :Sarkarnama
Published on
Updated on

PM Museum And Library Society: राजधानी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव आता अधिकृतरित्या पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय असे करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारपासून (१४ ऑगस्ट) हे नाव लागू करण्यात आले आहे.

पीएम म्युझियम आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. "समाजाचे लोकशाहीकरण आणि विविधीकरणाच्या अनुषंगाने, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी (NMML) आता 14 ऑगस्टपासून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटी असे नामांतर करण्यात आले आहे. तसेच, नामांतराची प्रक्रिया जूनमध्ये सुरू झाली आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे काम पूर्ण झाले हा निव्वळ योगायोग आहे, असंही सुर्यप्रकाश यांनी नमुद केलं.

Nehru Memorial Name Change :
Hitendra Thakur News : 'कार्यालयात येऊन फटकावेन’ आमदाराची मुजोरी ; महापालिका अधिकाऱ्यांना दमदाटी; तुमच्या कानाखाली वाजवली पाहिजे..

नाव बदलण्याचा निर्णय जून २०२३ मध्ये घेण्यात आला होता. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नामांतराचा निर्णय का घेतला गेला?

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्यानंतर अधिकृत निवासस्थान किशोर मूर्ती भवन होते. पंडित नेहरूंच्या निधनानंतर पुढे या संकुलाचे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीत संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. 2016 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक कल्पना मांडली की तीन मूर्ती संकुलात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित एक संग्रहालय असावे, ज्याला नेहरू स्मारकाच्या कार्यकारी परिषदेने मान्यता दिली.

Nehru Memorial Name Change :
Five State Election News: पाच राज्यांतील निवडणुकांसाठी केंद्रात बैठक: फडणवीसांना मिळणार मोठी जबाबदारी ?

2022 मध्ये, पंतप्रधानांना समर्पित हे संग्रहालय पूर्ण झाले. त्यानंतर ते एप्रिल 2022 मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले. जून महिन्यात झालेल्या बैठकीत नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नृपेंद्र मिश्रा,जे पीएम मोदींचे मुख्य सचिव होते, ते पीएम संग्रहालयाच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, जूनमध्ये जेव्हा नेहरू स्मारकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा काँग्रेसने त्यावरून मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.ज्यांना इतिहास नाही ते इतरांचा इतिहास पुसायला निघाले आहेत. नाव बदलून ते जवाहरलाल नेहरूंचे महत्त्व कमी करू शकत नाही, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com