Nepal Gen Z Protest: पेटलेल्या नेपाळमधून आणखी एक मोठी अपडेट; पंतप्रधान ओलींंपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Nepal President Resign : नेपाळमध्ये वाढता भ्रष्टाचार आणि सरकारने जवळपास सर्वच सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे प्रचंड मोठा हिंसाचार पेटला आहे. या देशातील Zenze झींनी आंदोलनाची सूत्रे हातात घेत थेट राजधानी काठमांडूच ताब्यात घेतली. त्यांनी संसद, न्यायालय पेटवून देत मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड सुरू आहे.
Nepal Violence
Nepal ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: नेपाळमध्ये वाढता भ्रष्टाचार आणि सरकारने जवळपास सर्वच सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे प्रचंड मोठा हिंसाचार पेटला आहे. या देशातील Zenze झींनी आंदोलनाची सूत्रे हातात घेत थेट राजधानी काठमांडूच ताब्यात घेतली. त्यांनी संसद, न्यायालय पेटवून देत मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पंतप्रधान के पी ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देश अज्ञातस्थळी ते पळाले आहेत. आता याच नेपाळमधून (Nepal) आणखी एक सर्वात मोठी धक्कादायक अपडेट समोर येत आहे.

नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी मंगळवारी (ता.9) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून ते अज्ञातस्थळी पळाले आहेत. ओली यांच्या या पलायनानंतर तेथील काही मंत्र्‍यांनीही राजीनामा देत देश सोडण्याच्या तयारीत आहे.

नेपाळमध्ये तरुणाईचा हे रौद्ररुप आणि पेटलेला हिंसाचार यामुळे तेथील ओली सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. नेपाळमधील वाढता भ्रष्टाचार आणि सरकारने जवळपास सर्वच सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे तरुणाईच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आंदोलकांची मजल थेट मंत्र्यांची निवासस्थाने पेटवून देण्यापर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर Zenze झींनी संसदेलाही आग लावली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारनं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यात इंजिनिअर ते रॅपर आणि रॅपर ते थेट पंतप्रधान अशी मजल मारलेल्या बालेन शाह पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

Nepal Violence
Devendra Fadnavis Reaction: फडणवीसांनी अखेर IPS अंजना कृष्णा अन् अजितदादा प्रकरणात लक्ष घातलं; म्हणाले,'मी जिल्हाधिकाऱ्यांकडे...'

नेपाळचं नियंत्रण सध्या लष्कराकडे आहे. पुढील काही तासांतच नव्या पंतप्रधानांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी बालेश शाह आहेत.

काठमांडूचे महापौर बालेन शाह यांची तरुणाईमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. शाह यांनी सोशल मीडियावरील बंदीविरोधात काढण्यात आलेल्या Gen Z च्या रॅलीला पाठिंबा दर्शवला होता. शाह यांनी महापौरपदाचा राजीनामा देऊन देशाची धुरा सांभाळावी अशी मागणी Gen Z आंदोलकांनी केली आहे.

Nepal Violence
Ahilyanagar death threat case : 'बंदुकीतल्या सहा गोळ्या घालीन, आमचे नेते आता खासदार झालेत'; ग्रामसेवकाला दिलेल्या धमकीनं खळबळ

नेपाळचे माजी उपपंतप्रधान रवि लामिछाने यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. आंदोलकांनी त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं आहे. त्यांचा पाठलाग करत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. तसेच आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिलेल्या डीसीपींची मॉबलिंचिंगमध्ये हत्या करण्यात आली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी नेपाळी तरुणांनी हिंसाचार सुरुच ठेवला आहे. दरम्यान, काठमांडूचे माजी महापौर बालेश शहा यांनाच आता पंतप्रधानपदी बसवा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. शाह यांनीही तरुणांना शांततेचं आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com