Rahul Gandhi yatra : नेपाळमार्गे तीन दहशतवादी बिहारमध्ये घुसले, राहुल गांधींची यात्रा धोक्यात?

Three Pakistani terrorists enter Bihar : बिहारमध्ये एकीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधींची यात्रा सुरू आहे. दुसरीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. अशात बिहारमध्ये तीन दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली आहे.
three Pakistani terrorist enter in bihar
three Pakistani terrorist enter in biharSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi yatra : बिहारमध्ये एकीकडे राहुल गांधींची यात्रा सुरू आहे तर दुसरीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. अशात बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिसांच्या मुख्यालयाने तसा अलर्ट जारी केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. पण पाकिस्तान काही सुधारलेलं दिसत नाही. पाकिस्तानकडून भारताविरुद्ध पुन्हा कट-कारस्थान रचण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. असे असताना नेपाळमार्गे तीन दहशतवादी बिहारमध्ये घुसल्याचा संशय आहे. बिहार पोलिसांनी या तीन दहशतवाद्यांचे फोटो व नाव देखील जारी केले आहेत. हसनैन अली, आदिल आणि उस्मान अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

यातील हसनैन अली हा रावळपिंडी येथील रहिवासी आहे. आदिल हुसैन उमरकोट तर मोहम्मद उस्मान हा बहावलपूर येथील राहणारा आहे. हे तीन्ही दहशतवादी बिहारमध्ये घुसल्याची माहिती आहे, पंरतु ते कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या ठिकाणी लपून आहेत याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, बिहार पोलिस व तपास यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

three Pakistani terrorist enter in bihar
Ramdev Baba US tariff : रामदेव बाबा संतापले : अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाका, ट्रम्पला झुकवू!

हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबधितीत असल्याचे वृत्त आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात ते नेपाळमधील काठमांडूमध्ये आले. गेल्या आठवड्यात त्यांनी लगेचच काठमांडूतून भारताच्या हद्दीत प्रवेश केला. सध्या ते बिहारमध्येच लपून बसले असून त्यांचे टार्गेट काय आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

three Pakistani terrorist enter in bihar
Arvind Kejriwal: ट्रम्प भित्रा माणूस त्यामुळं....; केजरीवालांनी मोदी सरकारला दिला भन्नाट सल्ला, आकडेवारीच केली सादर

दरम्यान, सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे, त्यामुळे मुंबईतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मतदार हक्क यात्रा सुरु आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. अलिकडेच नेपाळला लागून असलेल्या मधुबनी आणि सुपौलमधून त्यांची यात्रा गेली. ज्यामध्ये अररियाचा समावेश असून त्या मार्गाने घुसखोरीची शक्यता आहे. बिहारमधील तब्बल सात जिल्हे हे नेपाळच्या सीमेला लागून आहेत. राहुल गांधी यांनी यात्रे दरम्यान त्या ठिकाणांना भेट दिली आहे. ते काल सीतामढी या ठिकाणी होते. आज ते नेपाळ सीमेला लागून असलेल्या मोतिहारीला पोहाचले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com