Ramdev Baba US tariff : रामदेव बाबा संतापले : अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाका, ट्रम्पला झुकवू!

Donald Trump tariff policy : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. भारतीय बाजारपेठेवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याने गुरु रामदेव बाबांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
Ramdev Baba US tariff
Ramdev Baba US tariff Sarkarnama
Published on
Updated on

Ramdev Baba : अमेरिकेने भारतावर कालपासून (27 ऑगस्ट) 50 टक्के टॅरिफ लागू केलं आहे. भारतीय बाजारपेठेवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याने देशभरातून निषेध नोंदवला जात आहे. अमेरिकेविरोधात विविध स्तरातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून योग गुरु रामदेव बाबा यांनीही आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी 50 टक्के आयात शुल्क लागू करुन मोठी चूक केली आहे असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे.

रामदेव बाबा म्हणाले, टॅरिफ च्या माध्यमातून अमेरिकेने ही राजकीय गुंडगिरी सुरु केली आहे. अमेरिका भारताच्या कृषी क्षेत्रात घुसखोरी करू पाहत आहे. ते म्हणाले की, आता भारताने एकत्र येऊन अमेरिकेवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. अमेरिकीन कंपन्या, त्यांचे ब्रांड यांच्यावर बहिष्कार घाला. एकाही भारतीयाने पेप्सी, कोका कोला, सबवे, केएफसी आणि मॅक डोनाल्ड्स या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन रामदेव बाबांनी केलं आहे.

रामदेव बाबा पुढे म्हणाले, आपण सगळे भारतीय प्रतिज्ञा करूया की आपण परदेशी ब्रँडऐवजी स्वदेशी उत्पादने वापरू. यामुळे भारत स्वावलंबी होईल.'अमेरिकेच्या सगळ्या कंपन्या आणि ब्रांड्सवर असा बहिष्कार टाका की तिथे खळबड उडाली पाहिजे. तिथे महागाई एवढी वाढेल की डोनाल्ड ट्रम्प स्वतःहून टॅरिफ मागे घेतील असं रामदेव बाबा म्हणाले.

Ramdev Baba US tariff
US Tariff Impact: भारतातील 10 लाख नोकऱ्या धोक्यात! 48 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर होणार परिणाम; CTIचं पंतप्रधानांना खळबळजनक पत्र

भारताला मैन्युफैक्चरिंग हब बनवावे लागेल. आपल्याला चीनसारख्या उद्योगांना जमीन, वीज आणि कर सुविधा द्याव्या लागतील. भारताची अर्थव्यवस्था एकेकाळी 400 दशलक्ष डॉलर्सची होती. पण परकीय आक्रमकांनी आपल्याला लुटले आणि कमकुवत केले. आज आपल्याला परकीय कंपन्यांपेक्षा चांगली उत्पादने बनवून त्यांना धक्का देण्याची गरज आहे. असं रामदेव बाबा म्हणाले.

Ramdev Baba US tariff
Donald Trump: ट्रम्प यांची डबल ढोलकी! भारतावर लावला 50 टक्के टॅरिफ अन् रशियासोबत करताहेत तेल खरेदीचा करार

भारताने यातून घाबरुन जावू नये, आपण या आव्हानांचा सामना करु शकतो. ट्रम्प हे सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. भारताशी दादागिरीने वागून त्यांनी मोठी चूक केली आहे. आपल्याकडे आता संधी असून अमेरिकेतील कंपन्यावर व उत्पादनांवर बहिष्कार टाका. अमेरिका हा एक सभ्य देश मानला जात होता. पण टोनाल्ड ट्रम्प यांनी सगळी मूल्य पायदळी तुडवली आहेत, असं रामदेव बाबा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com