Narendra Modi Vs Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींपेक्षा राहुल गांधी सात पटीने श्रीमंत, कुणाची किती संपत्ती?

Asset of Rahul Gandhi And Narendra Modi :पंतप्रधान मोदींचे 2022-23 मध्ये एकूण उत्पन्न 23 लाख 56 हजार रुपये होते. तर त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख रुपये आहे. राहुल गांधी यांचे या आर्थिक एकूण उत्पन्न एक कोटी दोन लाख 78 हजार असून त्यांची एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
Narendra Modi Vs Rahul Gandhi
Narendra Modi Vs Rahul GandhiSarkarnama

Lok Sabha Election 2024 : देशाची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी होत आहे. राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली अशा दोन मतदारसंघातून लढत असून पीएम मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला आहे. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी पंतप्रधान मोदींपेक्षा सात पटीने श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही नेत्यांकडे ना घर आहे ना कार. त्यांच्या एकूण संपत्तीची किती, त्यांनी कुठे गुंतवणूक केली, याबाबत संपूर्ण माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे.

एकूण संपत्ती

पंतप्रधान मोदींचे Narendra Modi 2022-23 मध्ये एकूण उत्पन्न 23 लाख 56 हजार रुपये होते. तर त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख रुपये आहे. राहुल गांधी यांचे या आर्थिक एकूण उत्पन्न एक कोटी दोन लाख 78 हजार होते. त्यांच्याकडे नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त अचल संपत्ती आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

उत्पन्नाचे स्त्रोत

प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत हे त्यांचे सरकारी वेतन आणि त्यांच्या बचतीवरील व्याज आहे. तर राहुल गांधींना पगार, रॉयल्टी, भाडे, बचतीचे व्याज, लाभांश आणि म्युच्युअल फंडातील नफा असे उत्पन्न मिळते.बँकेतील रक्कम अन् कॅश

पीएम मोदी यांचे गांधीनगरमधील स्टेट बँकेत 73 हजार 304 रुपये, तर वाराणसीच्या बँकेत सात हजार रुपये आहेत. त्यांच्याकडे सुमारे 53 हजार रुपये रोख रक्कम आहे. तर राहुल गांधी यांचे बँक खात्यात 26 लाख 25 हजार रुपये असून त्यांच्याकडे 55 हजार रुपयांची कॅश आहे.

Narendra Modi Vs Rahul Gandhi
Uddhav Thackeray : पटेलांनी PM मोदींना जिरेटोप दिला; उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला, नेमके काय म्हणाले?

गुंतवणूक आणि मुदत ठेवी

पीएम मोदींच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात दोन कोटी 85 लाख 60 हजार रुपयांची मुदत ठेव आहे. तर राष्ट्रीय बचत योजनेत नऊ लाख 12 हजार रुपयांची आहेत. त्यांनी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तर राहुल Rahul Gandhi यांच्याकडे राष्ट्रीय बचत योजना, पोस्टल बचत आणि विमा पॉलिसीद्वारे सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत. तसेच त्यानी शेअर मार्केटमध्ये एकूण चार कोटी 33 लाख, म्युच्युअल फंडात 3 कोटी 81 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासह त्यांच्या नावे विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत.

Narendra Modi Vs Rahul Gandhi
Dheeraj Wadhawan Arrest : DHFL मध्ये तब्बल 34000 कोटींचा घोटाळा; धीरज वाधवनला CBIकडून अटक, काय आहे प्रकरण?

सोने आणि जमीन

पंतप्रधान मोदींकडे चार सोन्याच्या अंगठ्या असून त्यांची किंमत दोन लाख 67 हजार रुपये आहे. तसेच मोदी यांच्याकडे कुठेही जमीन नाही. तर राहुल यांच्याकडे चार लाखाहून अधिक रुपयांचे 333.3 ग्रॅम सोने आहे. राहुलकडे 15 लाख 21 हजार 740 रुपयांचे सोन्याचे रोखेही आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांच्याकडे दिल्ली परिसरात शेतीयोग्य जमीन आहे. यासह 2.346 एकर आहे. दुसरीकडे 1.432 एकर अशी जमीन आहे. यात बहीण प्रियांका गांधी वड्रा यांचाही निम्मा मालकी हक्क आहे.

Narendra Modi Vs Rahul Gandhi
Raj Thackeray : राज ठाकरे प्रचार करतात त्या उमेदवाराचा पराभव होतो; ठाकरे गटाने इतिहासच सांगितला

पाच वर्षांत उत्पन्न किती वाढले?

राहुल गांधी यांचे 2018-19 मध्ये उत्पन्न एक कोटी 20 लाख 37 हजार रुपये होते. ते 2019-20 मध्ये एक कोटी 21 लाख 54 हजार झाले. 2020-21 मध्ये एक कोटी 29 लाख 31 हजार तर 2021-22 मध्ये एक कोटी 31 लाख पाच रुपये होते. तर 2022-23 मध्ये उत्पन्नात एक कोटी दोन लाख 78 हजारांनी वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2018-19 मध्ये 11 लाख 14 हजार 230 रुपये उत्पन्न होते. 2019-20 मध्ये 17 लाख 20 हजार, तर 2020-21 मध्ये 17 लाख आठ हजार, 2021-22 मध्ये 15 लाख 42 हजार आणि तर 2022-23 मध्ये ते वाढून 23 कोटी ५६ लाख रुपये उत्पन्न झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्ज

राहुल गांधी यांच्यावर 49 लाख 79 हजार 184 रुपयांचे देणे आहे. तर त्यांनी आई सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्याकडून पाच लाखांचे कर्जही घेतले आहे. तर पंतप्रधान मोदींवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com