
West Bengal News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहे. त्यांनी केलेल्या विधानांवरून अब्रुनुकसानीचे खटले सुरू आहेत. आता त्यामध्ये आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. राहुल गांधी यांच्या सोशल मीडियातील एका पोस्टवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त 23 जानेवारी त्यांना श्रध्दांजली वाहणारी पोस्ट राहुल गांधींनी सोशल मीडियात केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राहुल यांनी नेताजींच्या मृत्यूच्या तारखेला उल्लेख केला होता. त्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली होती.
आता अखिल भारतीय हिंदू महासभेने याच पोस्टचा उल्लेख करत राहुल यांच्याविरोधात पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महासभेच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण कोलकातामधील नेताजींच्या घराजवळ राहुल यांच्याविरोधात निदर्शनेही केली.
महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले, नेताजींना आधी काँग्रेस आणि नंतर देश सोडण्यासाठी त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. हीच परंपरा राहुल गांधी पुढे नेत आहेत. त्यांनी नेहमीच भारतातील लोकांच्या आठवणीतून नेताजींच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविषयी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आरोप गोस्वामी यांनी केला.
राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये नेताजींच्या मृत्यूची तारीख 18 ऑगस्ट 1945 अशी लिहिली होती. याच दिवशी नेताजी यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला की नाही, यावरून अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे या तारखेवरून वाद सुरू आहे. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही राहुल यांची पोस्टीवरून टीका केली. तसेच भाजप आणि तृणमूल काँग्रसचे नेतेही राहुल यांच्यावर भडकले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.