T Raja Singh News : ''नागा साधूंना जर 15 मिनिटं दिली, तर हैदराबादेत...'' ; भाजप आमदार टी.राजा यांचं मोठं विधान!

BJP MLA T Raja On Owasi : जाणून घ्या, ओवैसींच्या नावाचा उल्लेख न करता टी.राजा यांनी आता नेमकं काय म्हटलं आहे?
T Raja on Naga Sadhu
T Raja on Naga SadhuSarkarnama
Published on
Updated on

T Raja on Naga Sadhu : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी काही वर्षांपूर्वी एक विधान केलं होतं, की जर फक्त 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केलं तर आम्ही दाखवून देवू. तर महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान असदुद्दीन ओवैसींनीही 15 मिनिटाबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं होतं. याशिवाय ओवैसी बंधूंच्या वक्तव्यावर विविध राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया याआधी उमटलेल्या आहेत.

यावेळी भाजप(BJP) नेते टी.राजा सिंह यांनी या 15 मिनिटाबाबतच्या वक्तव्यावर निशाणा साधत, बेधडक प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. टी राजा सिंह यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले की, तुम्ही लोक काय म्हणत आहात की आम्हाला 15 मिनिटं द्या, पोलिसांना हटवा, 100 कोटी हिंदूंना आम्ही संपवू. आज उत्तर प्रदेशात महाकुंभ सुरू आहे. लाखो नव्हे तर कोट्यवधी हिंदू पवित्र नदीत स्नान करत आहेत. साधू-संत स्नान करण्यासाठी जात आहेत. त्याच सांधू-संतांमध्ये एक साधू असतात नागा साधू.

T Raja on Naga Sadhu
India Budget Tradition : अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस अन् वेळेबाबत इंग्रजांपासूनची परंपरा सर्वप्रथम 'या' अर्थमंत्र्यानी मोडली!

पुढे टी राजा(T Raja) म्हणाले, नागा साधू कधी सार्वजनिक ठिकाणी येत नाहीत. केवळ कुंभ मेळ्यासाठीच ते बाहेर येतात. परंतु जर त्यांचा इतिहास उघडून बघितला तर, जेव्हा जेव्हा सनातन धर्मावर संकट आले, तेव्हा याच नागा साधूंनी तलवार, त्रिशूळ, भाला हाती घेतले आणि मुस्लिमांचा शिरच्छेद करण्याचं काम केलं.

T Raja on Naga Sadhu
Enemy Property and Saif Ali Khan : भारत सरकारने घोषित केलेली 'शत्रू संपत्ती' नेमकी कोणती अन् सैफचा काय आहे संबंध?

तसेच, का आताही 15 मिनिटं पाहिजेत. जर आमच्या नागा साधूंना 15 मिनिटं दिली गेली तर हैदराबादेत 15 मिनिटाबाबत वक्तव्य करणारे पाकिस्तानाला पळून जातील. हिंदूंशी कधीच टक्कर घेवू नका. हिंदू(Hindhu) जेव्हा-जेव्हा उठला आहे, तेव्हा तेव्हा त्याने इतिहास लिहिला आहे. याचबरोबर नेहमीच विरोध प्रदर्शना दरम्यान लगावल्या जाणाऱ्या आझादी-आझादीच्या नाऱ्यांबाबत देखील टी. राजा सिंह यांनी सभेला संबोधित करताना विधान केलं.

टी राजा सिंह म्हणाले, माझ्या भारतात राहून जो एनआरसीला विरोध करेल, जो सीएए विधेयकास विरोध करेल, भारतात राहून जो भारताशीच गद्दारी करेन, भारतात राहून जो लोकसंख्या आणि दहशतवाद वाढवेल, जो यूसीसीचा विरोध करेल, भारतात राहून जो गौमातेला कापेल, जो भारत माता की जय आणि वंदे मातरम नाही म्हणणार, भारतात राहून जो लव्ह जिहाद करेल, थूंक जिहार करेल. आम्ही त्याला कायमजी आझादी देवू, सांगा कोणाकोणाल आझादी हवी आहे, हिंदू आझादी द्यायला तयार आहे. कशापद्धतीने आझादी हवी आहे सांगा.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com