Israel Under Attack :
Israel Under Attack :Sarkarnama

Israel Under Attack : नेतान्याहू यांची युद्धाची घोषणा; इस्राईलवरील हल्ल्यांमध्ये 400 जणांचा मृत्यू

Israel-Palestine war : हमासच्या सैनिकांनी इस्राईलच्या सीमेत घुसखोरी करून इस्राईलवर रॉकेट हल्ला केला.
Published on

New Delhi : हमासच्या सैनिकांनी इस्राईलच्या सीमेत घुसखोरी करून इस्राईलवर रॉकेट हल्ला केला. यानंतर इस्राईलनेही हमासवर क्षेपणास्त्र डागले, गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना काल इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली.

गाझा पट्टीवर हवाई दलाकडून सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दहा हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्राईलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला केला. दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर हवाई, जमीन आणि सागरी मार्गातून हल्ला केला. हमासने इस्राईलचा काही भाग उडवून दिला. गाझा सीमेवरून इस्राईलच्या भागात शिरकावही केला. त्यानंतर इस्राईलनेही प्राणघातक कारवाई केली आहे.

Israel Under Attack :
Caste Census News : 'इंडिया' आघाडी करणार भाजपची कोंडी; लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा

गाजा पट्टीवर हवाई दलाकडून सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. या वेळी शत्रूला मोठी किंमत चुकवावी लागेल असेही सांगितले. इस्राईलने पॅलेस्टाइनविरुद्ध ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले आहे. नेतान्याहू यांनी आपल्या दूरचित्रवाणी संबोधनात म्हटले की, हमासला इतकी किंमत मोजावी लागेल की त्याची कल्पनाही केली नसेल.

येत्या काळात दहशतवाद्यांना धडा शिकवणार असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट करत दक्षिण इस्राईल दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर गाजा पट्टी धडा शिकवला जाईल, असे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. (Internation War) इतिहासातील हा सर्वात क्लेशदायक दिवस असून, दहशतवादी कारवाई झाल्यानंतर नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे.

Edited By- Anuradh Dhawade

Israel Under Attack :
Dhananjay Munde News : पक्ष चोरीला जातोय, असं म्हणणं जयंत पाटलांचा केविलवाणा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com