Dhananjay Munde News : पक्ष चोरीला जातोय, असं म्हणणं जयंत पाटलांचा केविलवाणा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

NCP Politics : मुंडे यांनी जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्या टीका आणि आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed : "देशात व राज्यात राजकीय पक्ष पळविण्याची व चोरण्याची पद्धत सुरू झाली आहे," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर केली. अजित पवार गटातील नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी जयंत पाटलांना उत्तर दिले आहे.

"लोकशाहीमध्ये कधीही कोणी कुठल्याच पक्षाची चोरी करत नसतं. लोकशाहीमध्ये ज्यावेळेस लोकशाही मान्य होत नाही. लोकशाहीमध्ये पक्षाचे बहुमत मान्य होत नाही. त्यावेळेस एखाद्याला वाटलं की आपला पक्ष हातून चाललाय, बहुमत नाही, लोकशाही मान्य नाही. त्यावेळेस त्यांनी पक्ष चोरीला जातोय, असे म्हणणं हा फक्त केविलवाणा प्रयत्न आहे," असे सांगत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर दिलं. ते माध्यमांशी बोलत होते.

Dhananjay Munde News
Nanded Hospital News : नांदेडमधील मृत्यू रोखण्यासाठी काँग्रेस सरसावली; नवीन भरती होईपर्यंत ५० परिचारिका देणार सेवा...

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. "एकाला वाटतंय पक्ष चोरला आणि दुसऱ्याला वाटतंय लुटारूंचं सरकार आहे. त्यामुळं यांना लोकशाही मान्य नाही, असे दिसते," असे म्हणत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका आणि आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.

"मला अभिमानाने सांगावसं वाटतंय एवढ्या अभूतपूर्व आणि अद्भुत पद्धतीने या राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही काम करतोय. हे सरकार गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे वंचितांचे, रक्षण करणाऱ्यांचे आहे," असे मुंडे म्हणाले.

"भारताच्या इतिहासात जे राजकीय पक्षाचे संस्थापक असतात, तेच पक्षाचे अध्यक्ष असतात. पण, काही जण त्यांना बाजूला करून स्वतःच अध्यक्ष असल्याच्या आविर्भावात असतात. देशात व राज्यात राजकीय पक्ष पळविण्याची व चोरण्याची पद्धत सुरू झाली आहे.’’ अशी टीका जयंत पाटील यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर केली होती.

Dhananjay Munde News
Shambhuraj Desai News : एकही आमदार नसणाऱ्या आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांवरील विधान निंदनीय; शंभूराज देसाईंचा टोमणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com