Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी फरिदाबादमधून राहुल गांधींसह विरोधकांना फटकारलं; म्हणाले, 'केरळ, कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली, तर आयोग योग्य, अन्...

BJP protest: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी महामोर्चा आयोजित केला. यावर भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत प्रत्युत्तर दिले.
Dharmendra Pradhan criticizes Rahul Gandhi and Congress over the Ramlila Maidan protest
Dharmendra Pradhan criticizes Rahul Gandhi and Congress over the Ramlila Maidan protestSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी एकत्र चांगलंच रान पेटवलं आहे.इंडिया आघाडीकडून पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, एसआयआर प्रक्रिया,मतचोरी यांसारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला घेरण्यासाठी रविवारी(ता.1 नोव्हेंबर) रामलीला मैदानावर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

तर भाजपकडूनही विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर म्हणून देशभरात मोर्च काढले जात आहेत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते धर्मेंद्र प्रधानांनी काँग्रेससह विरोधकांना फटकारलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनानंतर आपल्या शिक्षण मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या भाजपच्या धर्मेंद्र प्रधान हे विरोधकांवर तुटून पडले आहेत. हरियाणातील फरिदाबाद येथे भाजपच्या पदयात्रे दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षाची अवस्था ‘द्राक्षे मिळाली नाहीत म्हणून ती आंबट’ अशी झाली असल्याचा हल्लाबोल केला आहे.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले,“काँग्रेस पक्षाची अवस्था गावाकडे बोलल्या जाणाऱ्या ‘द्राक्षे मिळाली नाहीत की ती आंबट’ या म्हणीसारखी झाली आहे.सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांचा खरा चेहरा समोर आला आहे.”

तसेच राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी महागडे कपडे शिवून घेतल्याची टीका प्रधान यांनी केली.काँग्रेसकडे आता कोणतीही ठोस विचारधारा किंवा मुद्दे उरलेले नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.त्यामुळे देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकेची तोफही विरोधकांवर डागली आहे.

Dharmendra Pradhan criticizes Rahul Gandhi and Congress over the Ramlila Maidan protest
BJP News: 'शिस्तप्रिय' भाजपकडून 'अक्षम्य' चूक...! हयात असताना विचारलं नाही, निधनानंतर वर्षभरातच नेत्याचं नाव थेट कार्यकारिणीत झळकलं

धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस देशातील जनतेचा पाठिंबा गमावत असल्याचा दावा केला आहे. पक्षाचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असून तो जमावशाहीवर विश्वास ठेवू लागला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही काँग्रेसच्या भूमिकेमुळे कामकाजात अडथळे निर्माण करत विरोधकांनी संसदेतून माघार घेतल्याची टीकाही त्यांनी केली

सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रामलीला मैदानावर ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महामोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात प्रियंका गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. तर, दुसरीकडे भाजपकडूनही ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत देशभरात पदयात्रा आणि आंदोलनांचे आयोजन करण्यात आले. निवडणूक आयोगावरून काँग्रेसला घेरले

Dharmendra Pradhan criticizes Rahul Gandhi and Congress over the Ramlila Maidan protest
BJP News : विधानपरिषद निवडणूक जिंकताच भाजपमध्ये प्रवेश, आता 24 तासांतच मोठा निर्णय घेत युटर्न; म्हणाले, 'आम्ही .....'

काँग्रेस आणि राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुट्टपीपणाची भूमिका घेत असल्याचा हल्लाबोलही धर्मेंद्र प्रधानांनी केला आहे. केरळ, कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली तर निवडणूक आयोग योग्य असल्याचं त्यांच्याकडून सांगितले जाते. पण दुसरीकडे पश्चिम बंगाल किंवा हरियाणामध्ये पराभव झाला की, मात्र त्याच निवडणूक आयोगाला चुकीचे ठरवले जाते असल्याचा खोचक टोलाही विरोधकांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.