IAS Officer : चार्ज घेताच नव्या लेडी कलेक्टरचा कडक फतवा, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, 'सकाळी 10 वाजताच...'

New collector strict order to officers: नव्या महिला कलेक्टरने पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांसाठी कडक आदेश जारी केला. सकाळी 10 वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या आदेशामागे नेमकं कारण काय?
Jaishree Jain
Jaishree Jain Sarkarnama
Published on
Updated on

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्याच्या नव्या कलेक्टर जयश्री जैन यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनातील कामकाजात शिस्त आणि गती वाढवण्यासाठी त्यांनी भर दिला आहे. मंगळवारी कलेक्टोरेट कार्यालयात झालेल्या साप्ताहिक बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणे, सरकारी योजना आणि जनतेच्या तक्रारींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीलाच कलेक्टर जयश्री जैन यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेबाबत सक्त ताकीद दिली. त्यांनी सांगितले की, “सरकारी निर्देशांनुसार, त्यांनी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी सकाळी ठीक १० वाजता आपापल्या कार्यालयात उपस्थित राहावे, याची खात्री करावी.” या आदेशानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Jaishree Jain
Shalarth ID Scam : महाजनांच्या निकटवर्तीयाला 160 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक, पण एकदाही तुरुंगात नेलं नाही, आता रुग्णालयातूनच जामीन मिळणार?

कलेक्टरांनी सर्व विभागांमध्ये ई-ऑफिसच्या माध्यमातून कामकाज करणे अनिवार्य करण्याचे निर्देशही दिले. केवळ संगणक ऑपरेटरवर अवलंबून न राहता अधिकाऱ्यांनी स्वतः ई-ऑफिसची प्रक्रिया शिकून काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

कोण आहेत जयश्री जैन?

जयश्री जैन या 2016 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण छत्तीसगडमधील विश्रामपूर येथील सरकारी शाळेत झाले. पुढे होली क्रॉस कॉलेजमधून उच्च शिक्षण घेताना त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. 2005 मध्ये त्यांनी राज्य प्रशासनिक सेवेतून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर पदोन्नतीद्वारे IAS अधिकारी बनल्या.

सूरजपूर जिल्ह्यातील पहिल्या महिला IAS अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी 2021 मध्ये बिलासपूर येथे अपर कलेक्टर म्हणून काम केले. तसेच 2025 मध्ये राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. वन आणि हवामान बदल विभागात संयुक्त सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती, पाणी साचणारे भाग आणि जलजन्य आजारांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बचाव पथके आणि आवश्यक उपकरणे तत्पर ठेवण्याचे आदेशही कलेक्टरांनी दिले.

आरोग्य विभागातील बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, स्वच्छता मोहिमा आणि महिला बचत गटांच्या उत्पन्नवाढीच्या योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सेवा सेतू अॅप आणि CM हेल्पलाइन 1076 वरील प्रलंबित तक्रारी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

Jaishree Jain
Devendra Fadnavis : कुंभमेळा भूसंपादन वाद पेटला! फडणवीस नाशिकमध्ये येताच शेतकरी आक्रमक; थेट पोलीस ठाण्यात ठिय्या

तसेच लोकसेवा हमी, पेन्शन प्रकरणे, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, आयुष्मान योजना, पीएम आवास योजना आणि महसूल विभागातील नामांतरण, खाते विभाजन, सीमांकन यांसारखी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कलेक्टर जयश्री जैन यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या पहिल्याच कडक भूमिकेमुळे सक्ती जिल्ह्यातील प्रशासन अधिक सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com