Devendra Fadnavis : कुंभमेळा भूसंपादन वाद पेटला! फडणवीस नाशिकमध्ये येताच शेतकरी आक्रमक; थेट पोलीस ठाण्यात ठिय्या

Nashik farmers protest against land acquisition Kumbh Mela : नाशिकमध्ये कुंभमेळा भूसंपादनाचा वाद चिघळला असून देवेंद्र फडणवीस शहरात येताच शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
Devendra fadnavis
Devendra fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: कुंभमेळा विकास कामे विविध कारणांनी वादात सापडली आहेत. विशेषता साधू ग्राम आणि रिंग रोड जमीन संपादन वादात आहे. विरोधात शेतकरी प्रशासना विरोधात आक्रमक झाले आहेत. कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी शासनाकडून जमीन संपादन वादात सापडले आहे.

रिंग रोडच्या जमिनींना शेतकऱ्यांवर अन्याय करून ताब्यात घेतले जात आहे. रिंग रोडचा नकाशा बदलून अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस सातत्याने आंदोलन सुरू आहे. आता आंदोलक मुंबईला लॉंग मार्च करण्याच्या तयारीत आहेत. त्याची सुरुवात गेले दोन दिवस अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून झाली आहे.

Devendra fadnavis
Narhari Zhirwal : मंत्री झिरवळांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची थट्टा? म्हणाले, 'खाऊन-पिऊन आंदोलन करा...'; संतप्त विद्यार्थ्यांनी जागेवरच सुनावलं

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांनी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अडून बसले आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांची चर्चा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.

भूसंपादनाचा विषय आता राजकीय स्वरूप धारण करू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी रिंग रोड भूसंपादनाबाबत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादनाचे काम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Devendra fadnavis
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच सरकारची मोठी ओवाळणी! 1500 रुपये खात्यात जमा!

सिंहस्थ कुंभमेळा बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनाही जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही कुंभमेळ्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नगरसेवकांची नुकतीच आयुक्त सिंग यांनी चर्चा केली. त्यामुळे कुंभमेळ्याचे काम आता वादाचा विषय ठरवू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com