मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच सिद्धुंना पत्रकार परिषदेतच रडू कोसळलं!

15 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली असून त्यापैकी सहा चेहरे नवीन आहेत.
Punjab, Congress
Punjab, CongressFile Photo
Published on
Updated on

चंदीगड : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (ता.26) झाला. यावेळी 15 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली असून त्यापैकी सहा चेहरे नवीन आहेत. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातील सहा जणांना डच्चू देण्यात आला आहे. तर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्या समर्थक आमदारांनाही संधी देण्यात आली आहे.

अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिलेले बलबीर सिध्दू यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं आहे. ते अमरिंदरसिंग यांचे निकटवर्ती मानले जातात. मंत्रिमंडळातून काढण्यात आल्यानंतर सिध्दू यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माझा अपराध काय होता, असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळलं.

Punjab, Congress
राहुल गांधींच्या 'यंग ब्रिगेड'मधील नेत्याला भाजप करणार मंत्री!

सिध्दू म्हणाले, कोरोना काळामध्ये मी रात्रंदिवस काम केलं. मी पक्षश्रेष्टींना आत एकच प्रश्न विचारू इच्छितो, की माझा अपराध काय होता, ज्यामुळे मला मंत्रिमंडळातून बाहेर काढले. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो. ज्यादिवशी मतदान करण्यास सांगितले होते, तेव्हा मी म्हणालो होतो की, माझं मत सोनिया गंधींना आहे. त्यांनी चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलं, आम्ही या निर्णयाचं स्वागत केलं, असं सिध्दू यांनी सांगितलं.

Punjab, Congress
सर्वात श्रीमंत काँग्रेस आमदाराला मंत्री करण्यास विरोध

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 15 जणांचा शपथविधी झाला असून त्यामध्ये राजकुमार वेरका, संगतसिंग गिलजियान, परगटसिंग, अमरिंदरसिंग राजा वंडिंग, गुरकीरतसिंग कोटली, राणा गुरजीत सिंग या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये परगटसिंग, वंडिंग व गिलजियान हे नवज्योतसिंग सिध्दू यांचे समर्थक मानले जातात.

असे आहे पंजाबचे नवे मंत्रिमंडळ -

ब्रम्ह मोहिंद्रा, भारत भूषण आशु, मनप्रीत सिंग बादल, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, अरूणा चौधरी, रजिया सुल्ताना, विजय इंदर सिंगला, रणदीप सिंग नाभा, सुखबिंदर सरकारिया, राजकुमार वेरका, संगतसिंग गिलजियान, परगटसिंग, अमरिंदरसिंग राजा वंडिंग, गुरकीरतसिंग कोटली, राणा गुरजित सिंग.

विरोधानंतरही गुरजितसिंग यांचा समावेश

मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधीच सर्वात श्रीमंत आमदार असलेल्या राणा गुरजितिसंग यांना सहा आमदारांनीच विरोध केला होता. या आमदारांनी थेट प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना पत्र लिहिलं होतं. गुरजितसिंग यांना जानेवारी 2018 मध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं होतं. माती खणन घोटाळ्यामध्ये गुरजितसिंग यांच्या परिवारातील सदस्यांची नावे आहेत. या घोटाळ्यामुळं राज्याला 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असं या सहा आमदारांचं म्हणणं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com