माफी मागा, नाहीतर...! प्रियांका चतुर्वेदींचा शेलार, भातखळकरांना इशारा

निलंबनानंतर चतुर्वेदी यांच्यावर शेलार व इतरांनी गंभीर आरोप केले आहेत.
Ashish Shelar, Priyanka Chaturvedi, Atul Bhatkhalkar
Ashish Shelar, Priyanka Chaturvedi, Atul BhatkhalkarSarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपली बदनामी केल्याचा दावा करत चतुर्वेदी यांनी दोघांना माफी मागवी, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. माफी न मागितल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दोघांना दिला आहे.

प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यासह राज्यसभेतील बारा खासदारांना अधिवेशन काळापुरते निलंबित कऱण्यात आले आहे. या खासदारांनी माफी मागितल्यास निलंबन मागे घेऊ, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यानंतर बारा निलंबित खासदारांनी "माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का?" असे वक्तव्य केल्याचा मथळा असलेली बातमी ३० नोव्हेंबर रोजी एका इंग्रजी भाषिक माध्यमाने पसिध्द झाली होती. त्यानंतर या १२ निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेचे (Shivsena) २ खासदार असल्याने सावकरांविषयीचे हे वक्तव्य शिवसेनेनेच केले असल्याच्या चर्चांना सोशल मिडीयावर सुरुवात झाली.

Ashish Shelar, Priyanka Chaturvedi, Atul Bhatkhalkar
शशी थरूर महाबळेश्वरला लग्नाला आले अन् प्रश्न पडला...नक्की नवरदेव कोण?

प्रत्यक्षात बातमी पुर्ण वाचल्यानंतर हे वक्तव्य केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे निलंबित खासदार बिनोय विश्व (Binoy Viswam) यांनी केले असल्याचे दिसून येते. मात्र, शेलार यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी चतुर्वेदी यांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. चतुर्वेदी यांनी यापूर्वीच हे वक्तव्य आपले नसल्याचे स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतरही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

याविरोधात चतुर्वेदी यांनी कायदेशीर पाऊल उचललं आहे. त्यांनी शेलार, भातखळकर व भारत बलवल्ली यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपण कोणतंही वक्तव्य केलेलं नसताना त्यांनी आपली बदनामी केली. यामुळे समाजातील माझी प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच महाराष्ट्र माझ्याविषयी लोकांच्या भावना भडकवण्याचे हा प्रयत्न दिसतो. त्यामुळे आपण बिनशर्त माफी मागावी, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे दरम्यान, शेलार म्हणाले होते की, कोण या प्रियांका चतुर्वेदी महोदया? खासदारकीसाठी कुठल्या पक्षातून कुठे आल्या? कशाला सावरकरांशी तुलना करताय? किती माहिती आहेत, सावरकर तुम्हाला? सावरकर प्रेमी शिवसैनिक किती ओळखतात तुम्हाला? हिंदुहृदयसम्राट तरी कळलेत का? आता तुम्ही महाराष्ट्राला स्वा. सावरकर शिकवणार का? असा सवालही त्यांनी विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com