Rashid Engineer News : 'तिहार'मध्ये असलेल्या रशीद इंजीनिअर यांना खासदारकीची शपथ घेण्यास 'NIA'ने दिली परवानगी, मात्र...

NIA allowed Rashid Engineer to take oath as MP : रशीद इंजीनिअर नावाने प्रसिद्ध शेख अब्दुल रशीद दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्या प्रकरणात 2019पासून तिहार तुरुंगात बंद आहे.
NIA and Rashid Engineer News
NIA and Rashid Engineer NewsSarkarnama
Published on
Updated on

Baramulla Constituency MP Rashid Engineer News : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकलेले, फुटीरतावादी नेते शेख अब्दुल रशीद इंजीनिअर यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याची परवानगी मिळाली आहे. पटियाला हायकोर्टाने रशीद इंजीनिअर यांच्या जामीन अर्जावर निर्णय देत, त्यांना 5 जुलै रोजी शपथ घेण्यासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाचा औपचारिक विस्तृत आदेश मंगळवारी येणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर आता एनआयएने रशीद यांना संसदेत पदाची शपथ घेण्यासाठी 5 जुलै रोजी काही अटींसह परवानगी दिली आहे. ज्यामध्ये मीडियाशी न बोलण्याच्या अटीचाही समावेश आहे.

रशीद यांनी शपथ घेण्यासाठी आणि आपली संसदीय कार्य करण्यासाठी अंतरिम जामीन किंवा पर्यायी रुपाने अटकेदरम्यान पॅरोलची मागणी करत न्यायालयाकडे धाव घेतली होती. न्यायालयाने 22 जून रोजी प्रकरणाची सुनावणी ठेवली होती आणि एनआयएला(NIA) आपला जबाब नोंदवण्यास सांगितले होते.

एनआयएच्या वकिलांनी सोमवारी म्हटले की, रशीदची शपथविधी काही अटींच्या अधीन आहे. ज्यामध्ये मीडियाशी न बोलण्याचाही समावेश आहे. त्यांनी हेही म्हटले की रशीद यांना एका दिवसाच्या आत सर्व काही पूर्ण करावे लागेल. आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंह मंगळवारी याचिकेवर आदेश पारीत करणार आहेत.

NIA and Rashid Engineer News
Video Lok Sabha Session : लोकसभा बनली आंदोलनाचा आखाडा; मोदी अन् विरोधकही थांबेनात... पाहा व्हिडिओ

रशीद इंजीनिअर(Rashid Engineer) नावाने प्रसिद्ध शेख अब्दुल रशीद टेरर फंडिंग प्रकरणात 2019पासून तिहार तुरुंगात बंद आहे. तुरुंगात राहूनच त्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि या जागेवर प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला होता. त्यांनी उमर अब्दुल्ला आणि सज्जाद लोन यांचा पराभव केला होता.

रशीद यांनी बारामुल्ला जागेवरून 4,72,481 मतं मिळवली होती. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला(Omar Abdullah) यांचा 2,04,142 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत उमर अब्दुल्ला 2,68,339 मतं मिळाली. तर पीपुल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन यांना 1,73,239 मतं मिळाली होती. बारामुल्ला मतदारसंघात अब्दुल्ला आणि लोन यांच्यात थेट लढत मानली जात होती. मात्र रशीद मैदानात उतरले आणि तिथलं वातावरण बदललं

NIA and Rashid Engineer News
PM Narendra Modi : मोदींच्या भाषणावेळी प्रचंड गदारोळ; अध्यक्षांनी राहुल गांधींना खडसावले

कोण आहेत रशीद इंजीनिअर -

रशीद आवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आहेत. ते दोनवेळा आमदार होते. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द 2008मध्ये सुरू केली होती. एक बांधकाम अभियंता म्हणून नोकरी सोडून त्यांनी राजीनामा दिला व राजकारणाची वाट धरली होती. केवळ 17 दिवसांच्या प्रचारानंतर त्यांनी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील लंगेट मतदारसंघातून विजय मिळवला होता. पहिल्यांदाच त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com