Rajnath Singh : नाश्त्याला वेळ लागतो तेवढ्या वेळात शत्रुचा सुपडासाफ केलात..., भूज एअरबेसवर जाऊन राजनाथ सिंहांनी थोपटली सैनिकांची पाठ

Indian Air Force Operation Sindoor : पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त 23 मिनिटे पुरेशी होती, लोकांना नाश्ता करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात तुम्ही शत्रुचा सुपडासाफ केलात, असं म्हणत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
Defence Minister Rajnath Singh
Defence Minister Rajnath SinghSarkarnama
Published on
Updated on

Indian Air Force : पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला फक्त 23 मिनिटे पुरेशी होती, लोकांना नाश्ता करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात तुम्ही शत्रुचा सुपडासाफ केलात, असं म्हणत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी गुजरातमधील भुज एअरबेसला भेट दिली. यावेळी त्यांनी सैनिकांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत एअरचीफ मार्शल अमरप्रीत सिंह उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या सैनिकांना संबोधित केलं.

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, आपल्या देशाची ताकद या भूजमध्ये आहे. आज मी इथे तुम्हा सर्वांना भेटायला आलो याचा मला खूप अभिमान आहे. भूज ही भूमी 1965 आणि 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाची साक्षीदार आहे.

Defence Minister Rajnath Singh
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' केवळ ढोंग, दिखाव्यासाठी 3-4 विमानं हवेत पाठवली अन्...; काँग्रेस आमदाराने मागितले कारवाईचे पुरावे

हीच विजयाची परंपरा कायम ठेवत आज पुन्हा एकदा हे भूज पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे साक्षीदार बनल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. शिवय या मातीत देशभक्तीचा सुगंध असून सैनिकांमध्ये भारताचे रक्षण करण्याचा दृढ संकल्प आहे.

सशस्त्र दल आणि बीएसएफच्या सर्व शूर सैनिकांसह, मी सर्व हवाई योद्ध्यांना सलाम करतो, अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. तसंच यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर राबवताना तुम्ही जे काही केलं आहे. त्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. मग ते भारतात असोत की परदेशात.

पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी भारतीय हवाई दलाला केवळ 23 मिनिटे पुरेशी होती." दरम्यान, यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानने देखील आपल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद स्वीकारली असल्याचं म्हटलं. तसंच भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला मध्यरात्री दिवसारखा उजेड दाखवल्याचंही ते म्हणाले.

Defence Minister Rajnath Singh
India Pakistan Conflicts : पाकिस्तान आलं ताळ्यावर, शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार

शिवाय लोकांना नाश्ता करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात तुम्ही शत्रुंचा सुपडासाफ केला असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एवढा वेळात शत्रूच्या हद्दीत जाऊन तुम्ही मोहीम फत्ते केली. क्षेपणास्त्रं त्यांच्या तळांवर डागली त्याचा आवाज फक्त भारताच्या सीमेपुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण जगाने तो ऐकला. तो प्रतिध्वनी फक्त क्षेपणास्त्रांचा नव्हता, तर तुमच्या आणि भारतीय सशस्त्र दलाच्या सैनिकांच्या शौर्याचाही होता, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com