बेळगाव : कर्नाटकात (Karnataka) विधानसभेची रणधुमाळी आता कुठे वेग घेऊ लागली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील नऊ आमदारांना डावलून भाजप आणि काँग्रेस पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसकडून आणखी नावे वाढू शकतात, त्यामुळे बेळगावात (Belgaum) काँग्रेस-भाजपकडून धक्कातंत्र अवलंब करण्यात आला आहे. (Nine MLAs from BJP-Congress were denied tickets in Belgaum)
बेळगाव जिल्ह्यात १८ विधानसभा मतदार संघ आहेत. राष्ट्रीय पक्षांनी काही ठिकाणी आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तर काही मतदारसंघातील यादी अध्यापही जाहीर केलेली नाही. ज्या ठिकाणची यादी जाहीर झालेली आहे, त्यात भाजप व काँग्रेसने एकूण ९ जणांना उमेदवारीची पहिल्यांदा संधी दिली आहे. यामध्ये भाजपकडून ६ व काँग्रेसकडून ३ जणांचा समावेश आहे.
भाजप आणि काँग्रेसने आपली यादी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. कारण, यामध्ये विद्यमान आमदारांना देखील संधी देण्यात आली नाही. दोन्ही पक्षांनी एकदाही निवडणूक लढविलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामुळे त्यांना आपले सर्वस्व पणाला लावून निवडणुक लढवावी लागणार आहे. भाजपने १८ मतदारसंघाची यादी प्रसिद्ध केली आहे. यात त्यांनी ६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने अध्यापही आपली पुर्ण यादी प्रसिद्ध केलेली नाही. सध्यस्थितीत ३ नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे. या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
भाजपने उत्तर विधानसभा मतदार संघात आमदार अनिल बेनके यांचा पत्ता कट करून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तसेच ग्रामीणमध्ये माजी आमदार संजय पाटील यांना डावलून नागेश मन्नोळकर, सौंदत्तीमध्ये आनंद मामणी यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी रत्ना मामणी, यमकनमर्डीमध्ये मारुती अष्टगी यांना डावलून बसवराज हुंद्री, हुक्केरीत उमेश कत्ती यांच्या निधनामुळे त्यांचा मुलगा निखिल कत्ती, रामदुर्गमध्ये महादेवाप्पा यादवाड यांना डावलून चिक्क रेवण्णा यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसकडून गोकाकमध्ये यापूर्वी लखन जारकीहोळी यांना काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती, त्याठिकाणी महांतेश कडाडी यांना उमेदवारी दिली आहे. कित्तूरमधून डी. बी. इनामदार यांच्याजागी बाबासाहेब पाटील तर कुडचीतून राज घाटगे यांच्या ऐवजी महेंद्र तमन्नावर यांना उमेदवारी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.