Nitin Gadkari News : गडकरींकडून संसदेत काँग्रेसच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोलखोल; खर्गेंना दिले सडेतोड उत्तर...

Mallikarjun Kharge Parliament Session News : मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रीय महामार्गाबाबत विचारलेल्या प्रश्नांना नितीन गडकरी यांनी राज्यसभेत उत्तर दिले.
Mallikarjun Kharge, Nitin Gadkari
Mallikarjun Kharge, Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : संसदेमध्ये बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची पोलखोल केली. निधीअभावी राष्ट्रीय महामार्गांची कामे होत नसल्याचा आरोप खर्गेंनी केला होता. त्यावर उत्तर देताना गडकरींनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून कसे कौतुक होते, हे सांगतिले.

खर्गेंनी बुधवारी राज्यसभेत बोलताना निधीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, मंत्र्यांना खूप पत्र लिहिली. मी पंतप्रधानांनाही पत्र लिहिली. दर तीन ते सहा महिन्यांना मंत्र्यांना एक पत्र लिहितो. एखादे काम असेल तर बोलवून घेतात आणि काम करतात, याचे मी कौतुक करतो. पण गुलबर्गा, बेंगलुरू आदी भागातील महामार्गांबाबत कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे त्यांना आग्रहही केला, बैठकही झाली. पण पुढे काही झाले नाही.

Mallikarjun Kharge, Nitin Gadkari
Jitendra Awhad : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलेला अन् 'आरएसएस'च्या भूमिकेचं कट्टर विरोधक आव्हाडांकडून जाहीर कौतुक

राष्ट्रीय महामार्गांना नंबर देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात जावे लागले, अशी माहिती मला मिळाली आहे. पैशांसाठीही जावे लागते. आपण इकडून तिकडून बॉन्ड्स घेत आहात. ही तुमची मेहनत आहे. कारण तुमचे तुमचे डोके खूप चालते की, तुम्ही काही ना काही मार्ग काढता. यांच्याकडे पैसे नाहीत. जे काम सुरू आहेत, त्यालाही देत नाहीत. तुम्ही जमीन द्या, मी काम करतो, अशी कारणे देतात, असा आरोप खर्गेंनी केला.

खर्गेंचे आरोप खोडून काढताना गडकरी म्हणाले, कोणताही नंबर देण्याची फाईल पंतप्रधानांकडे जात नाहीत. त्यांनी मला नियुक्त केले आहे. माझ्या विभागातील अधिकारांमध्ये मी काम करतो, मला कसलीही अडचण नाही. केवळ कर्नाटकात जेव्हापासून राज्याच्या निर्मिती झाली, त्यानंतर 2014 पर्यंत जेवढे काम झाले, त्यापेक्षा जास्त काम आमचे सरकार आल्यानंतर झाले आहे.

Mallikarjun Kharge, Nitin Gadkari
BJP Politics : भाजप सरकारमध्ये मंत्री झाले, पण 5 वर्षांपूर्वीची केस पाठ सोडेना! पक्षावरही नामुष्की?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला दोनदा भेटून गेले. तुम्ही त्यांच्याशीही चर्चा करा. मला माहिती नाही, तुमची त्यांच्याशी चर्चा होते की नाही. तेही म्हणतात, आतापर्यंत आम्हाला जेवढे मिळाले नाही, तेवढे तुमच्याकडून मिळाले, असा दावा गडकरींनी केला. यावेळी सभागृहातील सत्ताधारी सदस्यांनीही बाके वाजवून त्याचे स्वागत केले. मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही अजेंडा सांगा. तुम्ही राष्ट्रीय महामार्गाबाबत जे-जे काम सांगाल, ते करून देतो, असे आश्वासनही गडकरींनी खर्गेंना दिले.   

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याकडून सातत्याने केंद्राकडून निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यासाठी दिल्लीतही आंदोलन करण्यात आले होते. आता गडकरींनी संसदेतच त्यांच्या भेटीबाबत आणि त्यांच्याकडून होत असलेल्या कौतुकाबाबत सांगतिले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची कोंडी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com