Mumbai News, 19 Mar : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा (Aurangzeb Tomb) मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ही कबर उखडून टाकावी अशी मागणी महायुतीतील काही नेत्यांसह बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको, ती उखडून काढा अशी आक्रमक भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली असून यासाठी त्यांनी आंदोलन देखील सुरू केलं आहे. एकीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी ही भूमिका घेतली आहे. मात्र, दुसरीकडे हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) मात्र सध्या औरंगजेबाची कबर हा मुद्दा संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे एकप्रकारे संघाने विहिंपचे कान टोचल्याचं बोललं जात आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेत संघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाजासाठी चांगला नाही. पोलिसांकडून याची दखल घेतली जात असून ते या प्रकरणाच्या मुळाशी जातील. आम्ही कुठल्याही हिंसेचे समर्थन करीत नाहीत, तसंच सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्या संयुक्तीक नाही."
दरम्यान, संघाच्या याच भूमिकेचं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वागत केलं आहे. आरएसएसने मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, आमचे विचार हे त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. मी संघाचा कट्टर विरोधक आहे. असं असतानाही ते अशी भूमिका घेत असतील तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे.
त्यांच्या या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो, असं म्हणत त्यांनी संघाच्या भूमिकेचं कौतुक केलं. मात्र, ही भूमिका आम्ही मांडली असती आमच्यावर टीका झाली असती आणि औरंगजेब आमचा बाप असल्याचं टीका करणाऱ्यांनी म्हटलं असतं. पण महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला इथेच गाडला हे आमच्या छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणीं यांच्या शौर्याचं प्रतिक आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.