Nitin Gadkari : नितीन गडकरींचं स्वप्न वेळच्या मागे : त्यांच्याच मंत्रालयाच्या कामांना सर्वाधिक विलंब!

Nitin Gadkari : महामार्गच्या क्षेत्रात सर्वात अधिक 358 प्रकल्पांना विलंब झाला आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

नवी दिल्ली: केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी नेहमी वेगवेगळे दावे करत असतात. मध्यंतरी ते म्हणाले की, 2024 पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे होतील, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आता त्यांच्याच सरकारच्या अहवालाने, त्यांनीच केलेल्या दाव्यावर प्रश्न उभे केले आहेत. त्यांच्याच खात्याचे प्रकल्प सर्वात जास्त विलंबाने सुरू झाले आहेत, असे अहवालातून निदर्शनास आले आहे.

पायाभूत सोयी - सुविधा विभागात रस्ते वाहतूकचे आणि महामार्गच्या क्षेत्रात सर्वात अधिक 358 प्रकल्पांना विलंब झाला आहे. सरकारच्या या अहवालाप्रमाणे या विभागानं रेल्वे मंत्रालयाचे 111 प्रकल्प आणि पेट्रोलियम मंत्रालयाचे 87 प्रकल्पांना विलंब झाला आहे. निवडणूक प्रचारात, अनेक सभांमधून गडकरी आपल्या मंत्रालयात निधीची कसलीही कमी लसल्याचे जाहीर करतात. असे ते नेहमी म्हणताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. हा सरकारी अहवाल त्यांच्या महत्त्वकांक्षी स्वप्नांना ब्रेक लगवणारा ठरत आहे.

Nitin Gadkari
Vijay Malokar : अकोल्यात ठाकरेंना धक्का; कट्टर शिवसैनिकाचा भाजपात प्रवेश

नितीन गडकरी लक्ष्य काय़ ?

नितीन गडकरी हे कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे, कामांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात असतात. यावर्षीच्या मार्च महिन्या दरम्यान संसदेत त्यांनी देशातील जनतेला मोठे आश्वासन दिले होते. डिसेंबर 2024 येईपर्यंत भारतातले रस्ते,अमेरिकेशी बरोबरी साधतील, असे त्यांनी म्हंटले होते.

Nitin Gadkari
Chattisgarh News : भाजप आमदाराचा चक्क हेल्मेट घालून भाषण : दगडफेक होण्याची धास्ती!

रेल्वेच्या महत्त्वपूर्ण 111 प्रकल्पांना विलंब :

रस्ते वाहतूक आणि तसेच महामार्ग क्षेत्रातील एकूण 769 पैकी तब्बल 358 प्रकल्प विलंबाने सुरू आहेत. रेल्वेतील 173 प्रकल्पांपैकी 111 प्रकल्प नियोजित वेळापत्रकाच्या मागे राहत आहेत. पेट्रोलियम क्षेत्रातील एकूण 154 प्रकल्पांपैकी 87 प्रकल्पही विलंबाने सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com