Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली!

Nitin Gadkari : कार्यक्रम सुरू असतानाच त्यांची तब्येत बिघडली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on: 
Updated on: 

पश्चिम बंगाल : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील एका जाहीर कार्यक्रमात मंचावरच त्यांना भोवळ आल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रम सुरु असताना मंचावरच त्यांना भोवळ आली आणि त्यांची तब्येत बिघडली. याआधी सु्द्धा त्यांना अशा प्रकारे जाहीर कार्यक्रमात अनेकदा भोवळ येऊन तब्येत बिघडली आहे.

नितीन गडकरी केंद्रिय मंत्री असल्याने त्यांचा विविध राज्यात दौरा असतो. ते जाहीर कार्यक्रमात सहभागी होत असतात. आज पश्चिम बंगालमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. मंचावर त्यांनी उपस्थिती लावली होती. या दरम्यान कार्यक्रम सुरू असतानाच त्यांनी मंचावर अचानक भोवळ आली. यामुळे त्यांची तब्येत बिघडली.

अचानक साखरेची पातळी घसरल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि केंद्रीय मंत्र्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

नितीन गडकरी हे सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या रस्त्याच्या पायाभरणीसाठी आले होते. दार्जिलिंग जंक्शनजवळील डागापूर मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांना अचानक भोवळ आली. प्रकृती बिघडली असता लगेच कार्यक्रम थांबवण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com