Nitin Gadkari News : माझ्याविरोधात 'पेड पॉलिटिकल कॅम्पेन' चालविले! नितीन गडकरी यांचा मोठा दावा, कुणावर साधला निशाणा?

Nitin Gadkari Alleges Paid Political Campaign : सोशल मीडियावर मला राजकीयदष्ट्या निशाणा बनविण्यासाठी एक कॅम्पेन चालविण्यात आले होते. ते एक पेड कॅम्पेन होते. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असे नितीन गडकरींनी स्पष्ट केले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Political controversy India : इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून मागील काही महिन्यांत अनेक चर्चा सुरू आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्वाकांक्षी निर्णय मानला जात आहे. पण त्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आले होते. त्यावर अखेर गडकरी यांनी रोखठोक भाष्य केले आहे. आपल्याविरोधात पेड पॉलिटिकल कॅम्पेन चालविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या दिल्लीत आयोजित 65 व्या वार्षिक संमेलनात गडकरी यांनी हे भाष्य केले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज, क्षमतेवर परिणाम झाल्याचा दावा अनेकांकडून केला जात होता. त्यावर बोलताना गडकरी यांनी आपण सोशल मीडियात पेड पॉलिटिकल कॅम्पेनचे शिकार झाल्याचे म्हटले आहे.

पारंपरिक इंधनासोबत 20 टक्के इथेनॉलचा वापर केला जात असलेल्या ई 20 पेट्रोलबाबतच्या समस्या वाढवून चढवून सांगण्यात येत आहेत. पण हे इंधन सुरक्षित आहे. नियामक आणि ऑटोमोबाईल उत्पादकांनी त्याचे समर्थन केले आहे. एआरएआय आणि सुप्रीम कोर्टानेही ई-20 योजनेबाबत स्पष्टता दिलेली आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Bihar Assembly Election : बिहारमध्ये 'एनडीए'ला धक्का बसणार? राहुल-तेजस्वी जोडीचं एक काम वरचढ...

सोशल मीडियावर मला राजकीयदष्ट्या निशाणा बनविण्यासाठी एक कॅम्पेन चालविण्यात आले होते. ते एक पेड कॅम्पेन होते. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले. ई-20 इंधनावरून सोशल मीडियात नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारवर टीका केली जात होती.

अनेक कार मालकांकडून ई-20 इंधनाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. वाहनांच्या इंजिनाची क्षमता कमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. विशेषत: 2023 च्या आधी उत्पादित झालेल्या कारमध्ये ही समस्या येत असल्याचा दावा केला जात आहे. तांत्रिकदृष्ट्या हे इंधन उपयुक्त नसल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या.

Nitin Gadkari
VP Election Result : समझने वालों को इशारा काफी है! उपराष्ट्रपती निवडणुकीत बदनामी महाराष्ट्राचीच…

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानेही याबाबत यापूर्वीच सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिले होते. नियमित पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची एनर्जी डेन्सिटी कमी असल्याने मायलेजमध्ये किंचित फरक पडतो. ई-10 साठी रचना करण्यात आलेल्या आणि ई-20 साठी रचना करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांसाठी हे प्रमाण 1-2 टक्के आणि इतर वाहनांसाठी जवळपास 3-6 टक्के असल्याचे सांगण्यात आले होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com