Bihar Assembly Election : बिहारमध्ये 'एनडीए'ला धक्का बसणार? राहुल-तेजस्वी जोडीचं एक काम वरचढ...

Rahul Gandhi and Tejashwi Yadav’s Eight-Party Alliance : आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (एमएल), सीपीएम या जुन्या मित्रपक्षांसोबत मुकेश सहानी यांचा व्हीआयपी पक्ष, पशुपती पारस यांचा आरएलजेपी आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे.
"Rahul Gandhi and Tejashwi Yadav join hands with eight parties, posing a major challenge to NDA in Bihar Assembly Election."
"Rahul Gandhi and Tejashwi Yadav join hands with eight parties, posing a major challenge to NDA in Bihar Assembly Election."Sarkarnama
Published on
Updated on

Impact of Opposition Unity on Bihar Politics : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाआधी राज्यातील छोटे-मोठे पक्ष आपल्यासोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूने कंबर कसली आहे. सध्यातरी त्यामध्ये इंडिया आघाडी वरचढ ठरली आहे. या पातळीवर आघाडीने एनडीएवर मात केली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये प्रमुख राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससह इतर तीन अशा एकूण पाच पक्षांचा समावेश होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुकेश सहानी यांचा पक्ष आघाडीमध्ये सामील झाला. आता 2025 च्या विधानसभा निवडणुकीआधी आणखी तीन पक्षांनी आघाडीसोबत जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आघाडीतील पक्षांचा आकडा आठवर पोहचण्याची दाट शक्यता आहे.

आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (एमएल), सीपीएम या जुन्या मित्रपक्षांसोबत मुकेश सहानी यांचा व्हीआयपी पक्ष, पशुपती पारस यांचा आरएलजेपी आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आय. पी. गुप्ता यांचा इंडियन इन्कलाब पक्षही आघाडीत येण्याची चर्चा आहे. पुढील आठवड्यात आघाडीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

"Rahul Gandhi and Tejashwi Yadav join hands with eight parties, posing a major challenge to NDA in Bihar Assembly Election."
VP Election Result : समझने वालों को इशारा काफी है! उपराष्ट्रपती निवडणुकीत बदनामी महाराष्ट्राचीच…

दुसरीकडे एनडीएमध्य सध्यातरी पाचच पक्षांचा समावेश आहे. भाजप, संयुक्त जनता दल, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती (रामविलास), उपेंद्र कुशवाहा यांचा व्हाआयपी आणि जीतनराम मांझी यांचा हम या पक्षांचा एनडीएमध्ये समावेश आहे. याबाबत आघाडीने आघाडी घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी आघाडीला केवळ 10 ते 12 आमदार कमी पडले होते. मतांचा आकडा जेमतेम 11 हजार एवढाच होता.

मागील निवडणुकीत आघाडी आणि एनडीएमध्ये प्रत्येका पाच पक्ष होते. आता आघाडीमधील पक्ष वाढल्याने त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. मागच्या निवडणुकीत काही जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला होता. छोट्या पक्षांना सोबत घेत हे अंतर कमी करत मोठा विजय साकार करण्याची रणनीती आघाडीने तयार केल्याचे दिसते. त्यामध्ये जातीय समीकरणेही दिसून येतात.

"Rahul Gandhi and Tejashwi Yadav join hands with eight parties, posing a major challenge to NDA in Bihar Assembly Election."
CJI Bhushan Gavai : सुप्रीम कोर्टात इंदिरा गांधींचा उल्लेख; सरन्यायाधीश गवई म्हणाले, आम्हाला संविधानाचा अभिमान, शेजारील देशांकडे पाहा..!

एनडीएतील चिराग पासवान यांचे काका माजी केंद्रीय त्री पशुपती कुमार पारस यांना आघाडीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून दलित मते आपल्याकडे वळविण्याचा प्लॅन आहे. तर आय. पी. गुप्ता यांच्या माध्यमातून तांती-ततवा जातींची मते आघाडीकडे वळू शकतात. गुप्ता हे आधी काँग्रेसमध्ये होते. आघाडीमध्ये पक्ष वाढल्यानंतर आता खरे आव्हान जागावाटपाचे असणार आहे. अर्थातच यामध्ये आरजेडी आणि काँग्रेसला एक पाऊल मागे घेत मित्रपक्षांना खूश करावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com