Lok Sabha Election 2024 : अक्षय, युवराज अन् कंगणा भाजपकडून निवडणूक लढणार? 'या' मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात

Bjp Lok Sabha Polls 2024 Candidate List : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरूवारी झाली. लवकरच पहिली यादी जाहीर होऊ शकते.
yuvraj singh Akshay Kumar Kangana Ranaut
yuvraj singh Akshay Kumar Kangana Ranautsarkarnama
Published on
Updated on

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election 2024 ) वारे वाहू लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ( Election Commission ) कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ( bjp ) उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्पात आलं आहे. किमान 100 उमेदरावांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडूचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे.

yuvraj singh Akshay Kumar Kangana Ranaut
Congress News : पिक्चर अभी बाकी है! माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी-मुलाने पुन्हा वाढवलं काँग्रेसचं टेन्शन

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरूवारी रात्री 11 पासून शुक्रवारी पहाटे 3.30 पर्यंत चालली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ), रक्षा मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासह मोठे नेते सामील होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) वाराणसीतून, गृहमंत्री अमित शाह गांधी नगर, लखनौतून संरक्षणंत्री राजनाथ सिंह, नागरपुरातून नितीन गडकरी, अमेठीतून स्मृती इराणी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे.

yuvraj singh Akshay Kumar Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024 : भाजप सीतारमण, जयशंकर यांना उमेदवारी देण्याचे धाडस करणार का? जुन्या मित्राकडून चॅलेंज

पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भाजप भोजपुरी सुपर स्टार पवन सिंह यांना उमेदवारी मिळू शकते. अभिनेत्री कंगना रणौत ( Kangana Ranaut ) हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर, अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar ) दिल्लीच्या चांदणी चौकातून आणि क्रिकेटर युवराज सिंह ( Yuvraj Singh ) पंजाबमधील गुरदासपूर येथून भाजपकडून लढणार असल्याचं बोललं जात आहे.

yuvraj singh Akshay Kumar Kangana Ranaut
Supreme Court News : आमदार-खासदारांच्या हातात मायक्रोचिप बसवायची का? सरन्यायाधीश चंद्रचूड भडकले

मध्य प्रदेशमधील भोपाळच्या विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं तिकिट कापले जाऊ शकते. त्यांच्याजागी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. भाजप दिल्लीतील अनेक चेहऱ्यांना बदलण्याच्या तयारीत आहे. तसेच, तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई लोकसभा निवडणूक लढवू शकतात.

yuvraj singh Akshay Kumar Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024 : खासदार पाटील भाजपमध्ये; महाराष्ट्रात धडपडणाऱ्या केसीआर यांचा पक्ष होतोय रिकामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com