Prashant Kishor : भाजपचं मोठं नुकसान कशामुळे झालं? प्रशांत किशोर यांनी सांगितलं 'कारण'

Prashant Kishor On lok sabha Election Result : भाजपला 300 हून अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली होती. पण, भाजपला 250 जागा सुद्धा पार करता आल्या नाहीत.
amit shah | narendra modi | prashant kishor
amit shah | narendra modi | prashant kishorsarkaranama
Published on
Updated on

Lok Sabha Election Result 2024 : नेत्यांच्या सभा, रॅली, टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोपानंतर झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून मतदान केलं आणि अखेर लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. त्यापूर्वी भाजपला ( bjp ) निवडणुकीत 300 हून अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणी राजकीय रणनीतीकार जन सुराज पक्षाचे सर्वेसर्वो प्रशांत किशोर यांनी कॉन्फिडन्सनं केली होती.

पण, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) यांचा कॉन्फिडन्स गळून पडला आहे. कारण, भाजपला 250 जागांचा आकडाही पार करता आला नाही. भाजपला 240 आणि संपूर्ण 'एनडीए'ला 293 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 100 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 63 जागा गमवाव्या लागल्या आहेत.

त्यासह भाजपचा '400 पार'चा नाराही फेल झाला आहे. 'एनडीए'ला '300 पार'ही करता आलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला एवढा मोठा फटका कशामुळे बसला, यावर प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे. तसेच, आपलं भाकीत खोटं ठरल्याचं प्रशांत किशोर यांनी मान्य केलं आहे.

"ज्यानं कुणीही '400 पार' नारा लिहिला, त्या नाऱ्यात कुठलंही चुकीचं नाही. पण, हा नारा अर्धवट आहे. '400 पार'चा नारा कशासाठी हवा आहे? याबद्दल त्यांनी सांगितलं नाही. जसंकी 2014 मध्ये 'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' असे नारे देण्यात आले होते. याचा उद्देश स्पष्ट होता की, महागाई असल्यामुळे मोदी सरकार पाहिजे."

...म्हणून झालं मोठं नुकसान

"यावेळी भाजपनं '400 पार'चा नारा दिला. पण, हा नारा अहंकारातून दिल्याचं जनतेला वाटलं. तसेच, संविधान बदलण्यासाठी हा नारा दिला जात असल्याचा मुद्दा विरोधी पक्षानं उचलून धरला. ज्यानं कुणीही हा नारा लिहिला, त्यानं '400 पार' जागा का पाहिजे हे सांगितलं नाही. '400 पार'च्या नाऱ्यामुळेच भाजपला सगळ्या जागांवर मोठं नुकसान झालं आहे," असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.

amit shah | narendra modi | prashant kishor
Narendra Modi : महाराष्ट्रात मोदी 'ब्रॅण्ड'ला जबरदस्त धक्का

"भाजपच्या कार्यकर्त्यांना कुणीही विचारत नव्हते"

"भाजपची सर्वात कमजोर बाजू मोदींवर अवलंबून राहणं ही आहे. कार्यकर्त्यानं म्हटलं, 400 जागा येणार आहेत. त्यामुळे खासदाराला धडा शिकवावा. माझ्या मतदारसंघातील आर. के. सिंह यांचं उदाहरण घेऊ शकतो. भाजपचे कार्यकर्ते नाराज होते, कारण त्यांना कुणीही विचारत नव्हतं," असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com