Nitish Kumar News : भाजपसोबत जाताच नितीशकुमारांकडून लालूंना पहिला दणका

Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबतची आघाडी जेडीयूने तोडली आहे.
Nitish Kumar, Lalu Prasad Yadav
Nitish Kumar, Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पहिला मोठा धक्का दिला आहे. आरजेडी आणि नितीशकुमारांच्या जेडीयूची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाचा मान आरजेडीला मिळाला होता. पण सत्ताबदल होताच नितीशकुमारांनी अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणत त्यांना हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. (Nitish Kumar News)

आरजेडीचे (RJD) नेते अवध बिहारी चौधरी हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आली आहे. भाजपचे (BJP) नेते नंदकिशोर यादव आणि माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद तसेच हमचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, जेडीयूचे विनय कुमार चौधरी, रत्नेश साडा आणि एनडीएतील इतर आमदारांनी ही नोटीस दिली आहे.

Nitish Kumar, Lalu Prasad Yadav
Sharad Pawar News : नितीशकुमारांच्या 'यू-टर्न'वर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मागील काही दिवसांपासून नितीशकुमार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार त्यांनी रविवारी पदाचा राजीनामा देत एनडीएसोबत सरकार स्थापन केले. त्यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडताना ते पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली होती. तसेच पुन्हा भाजसोबत जाणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाही केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारमधील (Bihar) सत्तानाट्याचा थेट परिणाम आता इंडिया आघाडीवर (India Alliance) होणार आहे. आघाडीतील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच विरोधाचा सूर आळवला आहे. बंगालसह पंजाबमध्ये काँग्रेसशी (Congress) आघाडी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यात आता बिहारमध्येही आघाडीला धक्का बसला आहे.

बिहारमध्ये एनडीएचे संख्याबळ आता 128 वर पोहचले आहे. एकूण 243 आमदारांच्या विधानसभेत 122 हा जादूई आकडा आहे. आरजेडी व काँग्रेससह आघाडीचे संख्याबळ 114 आहे. विशेष म्हणजे राज्यात 79 आमदारांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष आहे. तर भाजपकडे 78, जेडीयूकडे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत.

Nitish Kumar, Lalu Prasad Yadav
Central Budget 2024 : लोकसभेपूर्वी राम राज्यात मिळणार अंतरिम बजेटचा ‘प्रसाद’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com