Nitish Kumar On Narendra Modi : आकड्यांच्या गोंधळानंतर आता मोदींच्या पदाचाही घोळ; नितीशकुमार नेमके काय म्हणाले?

Bihar Political News : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. या काळात देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने 400 हून अधिक जागा जिंकण्यासाठी दंड बैठका काढून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची तयारी केलेली आहे.
Nitish Kumar, Narendra Modi
Nitish Kumar, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : 'अब की बार चार सौ पार'चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीत विरोधकांना गलीतगात्र करण्याचा मोठा डाव टाकला. त्यानंतर आतापर्यंत निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. या काळात नितीशकुमारांनी वारंवार आकड्यांचा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. आता तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदाबाबतच घोळ घातला. त्यामुळे त्यांना विरोधकांडून ट्रोल केले जात आहे. Nitish Kumar On Narendra Modi

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. या काळात देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने 400 हून अधिक जागा जिंकण्यासाठी दंड बैठका काढून नरेंद्र मोदींना Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची तयारी केलेली आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदींना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान ऐवजी ते मुख्यमंत्री म्हणाल्याचा व्हिडिओ आता देशभर व्हायरल होत आहे.

पाटणा येथील एका सभेत नितीशकुमार Nitish Kumar म्हणाले, या निवडणुकीत एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील. या खासदारांच्या जोरावर नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यामुळे भारताचा विकास होईल, बिहारचा विकास होणार आहे. सर्व काही मंगल होईल, असे कुमार म्हणाले. यावेळी इतर नेत्यांनी झालेली चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मोदीजी आता पंतप्रधान आहेतच आणि पुढेही होतील. मलाही तेच म्हणायचे होते, असे म्हणत आपली झालेली चूक दुरुस्त केली.

Nitish Kumar, Narendra Modi
Jalna Lok Sabha Analysis : रावसाहेब दानवेंशी मैत्री; मग गोरंट्याल यांची साथ कल्याण काळेंना मिळाली का?

यापूर्वी पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतच नितीशकुमारांनी ४०० ऐवजी चार हजार खासदार जिंकणार असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, या निवडणुकीत महायुतीला चार हजार जागा मिळतील. मला वाटते की आपण चार हजारहून अधिक जागांवर हमखास जिंकू, असे ते चुकून बोलले होते. तत्पुर्वी ते चार हजारऐवजी चार लाख म्हणणार होते. मात्र ला.. म्हणून ते हजार म्हणाले. त्यावर विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींच्या या सभेनंतर 1 मे रोजीही नितीशकुमार यांनी चारशे जागांऐवजी चार हजार जागा असा उल्लेख केला होता. त्यावेळी आकड्यांचा झालेला गोंधळ लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यात सुधारणा करून चारशे आकडा म्हणाले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Nitish Kumar, Narendra Modi
Lok Sabha Election News: अजितदादांचे उमेदवार निवडून येऊ नयेत यासाठी शिंदे गटाची फिल्डिंग, ठाकरे गटाचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com