Jalna Lok Sabha Analysis : रावसाहेब दानवेंशी मैत्री; मग गोरंट्याल यांची साथ कल्याण काळेंना मिळाली का?

Kailas Gorantyal : जालन्यात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसकडे ऐकमेव कैलास गोरंट्याल आमदार आहेत. ते शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा पराभव करून विजयी झाले होते. खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील वैर मराठवाड्याला नवे नाही.
Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb DanveSarkarnama

Jalna Political News : लोकसभेच्या जालना मतदारसंघाची चर्चा सध्या मराठवाड्यासह राज्यात सुरू आहे. महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे विजयाचा षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. तर महाविकास आघाडीने त्यांचा झेल सीमारेषेतच घेण्याची जबाबदारी माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर सोपवली होती. मतदानानंतर दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे सुरू आहेत. काँग्रेसचे कल्याण काळेंचा आत्मविश्वास तर इतका वाढला आहे, की त्यांनी निकालाची वाट न पाहता आभार दौरे सुरू केले आहेत. Jalna Lok Sabha Analysis

जालना लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर काँग्रेसकडे ऐकमेव जालन्याची जागा आहे. कैलास गोरंट्याल Kailas Gorantyal हे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा 25 हजार 338 मतांनी पराभव करून विजयी झाले होते. 1999 ते 2019 या 25 वर्षांत दोनवेळा अर्जुन खोतकर तर तीनवेळा कैलास गोरंट्याल हेच ऐकमेकांच्या विरोधात लढले आहेत. या दोघांमधील राजकीय वैर मराठवाड्याला नवे नाही.

आता काही वर्षांपासून आमदार गोरंट्याल आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांच्यातील जवळीक कमालीची वाढली होती. नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेले विकास काम असो, की मग दानवे यांनी आणलेल्या खासदार निधी, रेल्वे खात्याच्या पैशातून झालेल्या कामाचे भुमीपूजन, लोकार्पण, उद्घाटन यामध्ये गोरंट्याल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत होती. एका रेल्वेच्या कार्यक्रमात भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी कैलास गोरंट्याल यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण आपल्या शायराना अंदाजात गोरंट्याल यांनी ती नाकारली.

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Ravindra Dhangekar News : रवींद्र धंगेकरांवर रूपाली ठोंबरे चिडल्या; अजितदादांचे नाव घेत नेमके काय म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकीत गोरंट्याल यांची भूमिका नेमकी काय होती? याबद्दल जिल्ह्यात चर्चा होताना दिसते. एकीकडे रावसाहेब दानवे यांच्यासोबतची मैत्री, तर दुसरीकडे पक्षशिस्त आणि महाविकास आघाडीचा धर्म. अशावेळी गोरंट्याल यांनी काळे Kalyan Kale यांनाच साथ दिली असणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काळे यांच्या आभार दौऱ्यात गोरंट्याल जालना मतदारसंघात त्यांच्यासोबत दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय घेणे कितपत योग्य आहे, हे चार जूनच्या निकालानंतर जेव्हा मतदारसंघनिहाय झालेल्या मतांचा आकडा बाहेर येईल, तेव्हाच स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराविरुद्धची लढाई सोपी नाही, याची जाणीव महाविकास आघाडीला होती. त्यामुळे हक्काच्या आणि पक्षाचा आमदार असलेल्या मतदारसंघातून निश्चितच काळे यांना अधिक अपेक्षा असणार आहे. त्यांच्या अपेक्षा गोरंट्याल त्यांना मताधिक्य मिळवून देत पुर्ण करतात का? हे पहावे लागेल.

(Edited by Sunil Dhumal)

Kalyan Kale, Kailas Gorantyal, Raosaheb Danve
Sanjay Raut Vs Vikas Thackeray : 'संजय राऊत बालिश.. मी कच्चा खेळाडू नाही..'; विकास ठाकरेंचा सडेतोड पलटवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com