Lok Sabha Election News: अजितदादांचे उमेदवार निवडून येऊ नयेत यासाठी शिंदे गटाची फिल्डिंग, ठाकरे गटाचा दावा

Lok Sabha Election 2024 News: निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी किमान 40 ते 50 कोटींचा वापर केला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shindesarkarnama

Ambadas Danve On Mahayuti: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज महायुतीतील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकांसाठी पैशाचा बेसुमार वापर झाला असून, निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Eknath Shinde and Ajit Pawar) यांनी किमान 40 ते 50 कोटींचा वापर केल्याचा आरोप दानवे यांनी केला.

बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मध्ये बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना बीडच्या मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीचं समर्थन दानवेंनी केलं. दानवे म्हणाले, "बीडमध्ये (Beed) बोगस मतदान करतानाच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. बीडमध्ये ज्यापद्धतीने प्रशासनाच्या यंत्रणेला वेठीस धरलं जातं, अधिकारी सत्ताधाऱ्यांना ज्याप्रकारे मदत करताहेत, ते पाहता बजरंग सोनावणे यांची मागणी चुकीची नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर यावेळी त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या 26 कोटींच्या रोकडवरुन सरकारला धारेवर धरलं. नाशिकमध्ये जे पैसे सापडले याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांनी आरोप केले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बॅगा घेऊन जाताना दिसले. त्याची कुठेच चौकशी झाली नाही, या प्रकरणाची निश्चित चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी दानवे यांनी केली.

तर निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काळात महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी किमान 40 ते 50 कोटींचा वापर केला आहे. मग त्यामध्ये मुंबई, मराठवाडा, बारामती आणि पुणे अशा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीच्या काळात गुंडांना पॅरोलवर सोडण्यात आलं, मतदारांना पैसे वाटण्याचं धोरण पहिल्यांदा महाराष्ट्राने अनुभवलं असल्याचंही दानवे म्हणाले.

शिंदे गटाने वेगवेगळ्या व्यूहरचना केल्या

अजितदादा ज्या ज्या ठिकाणी जागा लढवत आहेत, त्या ठिकाणी शिंदे गटाने वेगवेगळ्या व्यूहरचना केल्या आहेत. बारामतीत (Baramati) पुरंदरचे शिंदे गटाचे माजी मंत्री सतत वक्तव्य करत होते. त्यानंतर त्यांनी काम केलं की नाही माहीती नाही. शिंदे गटाने जाणीवपूर्वक त्यांचे कार्यकर्ते, काही यंत्रणांच्या मार्फत अजितदादा गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केला आहे, असं त्या भागातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत असल्याचा दावा दानवे यांनी केला.

Ajit Pawar, Eknath Shinde
Anil Deshmukh News : 'गडकरींना पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केले, हे..' ; अनिल देशमुखांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com