भाजपसोबतचा हनिमून संपला? मुख्यमंत्री नितीश अन् विधानसभा अध्यक्षांत नळावरचं भांडण

बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप या सहकारी पक्षांचा हनिमून संपल्याची चिन्हे आहेत.
Nitish Kumar and Narendra Modi
Nitish Kumar and Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

पाटणा : कोणत्याही विधानसभेत दिसणार असे चित्र बिहारच्या विधानसभेत दिसून आले. सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपचा हनिमून संपल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्यात सभागृहातच जोरदार जुंपली होती. या निमित्ताने भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. यामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे काल (ता.14) थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकले. सभागृहात सर्वांसमोर नितीश यांनी अध्यक्षांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिली. विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा हे भाजप (BJP) आहेत. नितीश हे अध्यक्षांना झापत असताना भाजपचे मंत्री व आमदार मात्र, शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत बसून होते. यामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपमधील दरी वाढल्याची समोर आले आहे. भाजपमधील नेत्यांनी आता यावरून नितीश यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. याला जेडीयूचे नेते प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. यामुळे सरकारमधील अनागोंदी उघड झाली आहे.

Nitish Kumar and Narendra Modi
नवाब मलिकांचा पाय खोलात; उच्च न्यायालयाचाही दणका

विधानसभा अध्यक्ष सिन्हा यांचा मतदारसंघ लखीसराय आहे. त्यांच्या मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांची हत्या झाली आहे. या प्रकरणावर काल सभागृहात मंत्री बिजेंद्र यादव उत्तर देत होते. या वेळी सभागृहाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नितीशकुमार संतापले. ते अध्यक्षांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही ज्या पद्धतीने कामकाज हाताळत आहात, ते मला पटलेले नाही. सभागृहात घटनेनुसार कामकाज अपेक्षित असते. परंपरांकडे काणाडोळा केला जाताना दिसत आहे.

Nitish Kumar and Narendra Modi
विरोधकांना धक्का! पाच आमदारांना निलंबित केलं अन् थेट उचलून सभागृहाबाहेर काढलं

नितीशकुमार यांचा संताप पाहून अध्यक्षांसह भाजपचे आमदारही गप्पगार पडले. ते शांतपणे संतप्त नितीशकुमारांचे बोलणे ऐकत होते. लखीसरायमध्ये गेल्या काही दिवसांत नऊ जणांची हत्‍या झाल्याप्रकरणी मंत्र्यांच्या उत्तरावर भाजपचे आमदार संजय सरावगी यांनी पुरवणी प्रश्‍नोत्तराच्या वेळी प्रश्न उपस्थित केले. यातील काही घटनांमध्ये आरोपींना अद्याप पकडण्यात आलेले नाही. यावर विजयकुमार सिन्हा यांनी मंत्र्यांना मुदत देत 16 मार्चला पुन्हा उत्तर देण्याची सूचना केली. अध्यक्षांच्या या कामकाजाच्या पद्धतीवर नितीशकुमार संतप्त झाले. त्यांनी थेट सभागृहात येऊन अध्यक्षांना धारेवर धरले. त्यांचा राग अनावर झालेला पाहून सभागृहातील सत्ताधारी व विरोधकही हैराण झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com