नवाब मलिकांचा पाय खोलात; उच्च न्यायालयाचाही दणका

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik News
Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिक यांनी त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने मलिक यांना दणका देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. (Nawab Malik News Updates)

ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना आता सुटकेसाठी रीतसर जामिनासाठी अर्ज करावा लागेल.

मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली होती. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik News
विरोधकांना धक्का! पाच आमदारांना निलंबित केलं अन् थेट उचलून सभागृहाबाहेर काढलं

दरम्यान, याआधी नवाब मलिक यांच्या तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. दरम्यान, मलिक यांच्या अटकेनंतर सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik News
अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकतात तेव्हा...

मलिक यांनी आधीच कारवाईची माहिती

ईडीकडून अशा प्रकारची कारवाई होणार ही माहिती दोन-तीन महिन्यांपूर्वीच मलिक यांना मिळाली होती. खुद्द मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी याबाबत गौप्यस्फोट केला होता. निलोफर मलिक म्हणाल्या होत्या की, ईडी आमच्यावर कारवाई करणार हे दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्यांना माहिती झाले होते. माझ्या वडिलांनी मला आपण काही चुकीचे केले नसून, काळजी घेण्यास सांगितले होते. माझे वडील निर्भीडपणे बोलत होते. त्यामुळे त्यांच्या मागे ईडी आणि एनसीबीचा ससेमिरा लावण्यात आला. माझे वडील यातून बाहेर याची मला खात्री आहे. ही न्यायालयीन लढाई असून, ती आम्ही लढणार आहोत. सार्वजनिक जीवनात काम करीत असलेल्या प्रत्येक मुस्लिमाचे नाव डी-कंपनीशी जोडले जाते. हे अतिशय चुकीचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com