
BJP CM Oath Ceremony Delhi : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स अद्याप कायम आहे. मात्र शपथविधीच्या तारीख अन् वेळेची घोषणा झालेली आहे. शिवाय, या भव्य अशा शपथविधी सोहळ्याची तयारीही जोरदार सुरू आहे. यासाठी देशभरातून पाहुणे बोलावले गेले आहेत.
विशेष करून एनडीएमधील घटक पक्षांचे सर्वच प्रमुख आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आवर्जून उपस्थित असणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीए आघाडीतील महत्त्वाचा भाग असणारे जदयूचे प्रमुख अन् बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार(Nitishkumar) हे जाणार नाहीत.
ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली, राजकीय वर्तुळात तर उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या. वेगवेगळे तर्क लावले जावू लागले. दरम्यान, नितीश कुमारांच्या गैरहजरीचे कारण समोर आले आहे. 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी नितीश कुमार यांची नियोजित प्रगती यात्रा आहे, त्यामुळे ते शपथविधी सोहळ्यास जाऊ शकणार नाहीत. मात्र बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे हजर राहणार आहेत.
याशिवाय जदयू(JDU)कडून सांगितले गेले आहे की, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय झा आणि कंद्रीयमंत्री ललन सिंह हे शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील. याचबरोबर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे देखील शपथविधी सोहळ्यास हजर असतील. असंही सांगितलं जात आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यातील अर्थसंकल्प आणि विधानसभा सत्रामुळे येऊ शकणार नाहीत असे भाजपा कळवले गेले आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभेच्या(Delhi Vidhan sabha Election) निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता मुख्यंमत्री कोण, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम गुरुवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रमाची तयारी रामलीला मैदानावर जय्यत सुरू आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.