Bangladeshi issue Malegaon : मालेगावची स्थिती, 'इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...'

Kirit Somaiya and Malegaon Politics : किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी प्रश्नावरून मालेगाव शहरात नवा वाद निर्माण केला आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya 0n Illegal immigrants in Malegaon : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी प्रश्नावरून मालेगाव शहरात नवा वाद निर्माण केला आहे. आता हे राजकारण बांगलादेशी विषयाकडून जन्मतारखेच्या दाखल्यांवर पोहोचले आहे. त्याची झळ चक्क हिंदू नागरिकांनांही बसली आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम या विषयावर भाजपने राजकीय वातावरण तापवले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री देखील आहे. त्यामुळे त्यांनी या विषयावर गांभीर्याने कारवाई करण्याची सूचना सबंध पोलिस दलाला दिली आहे.

मात्र त्याची झळ सामान्य नागरिकांना बसली आहे. मालेगाव(Malegaon) शहरासाठी विशेष तपास यंत्रणा एसआयटी निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेने आतापर्यंत 3000 नागरिकांना नोटीस बजावली आहे. सध्या शहरात फेरफटका मारला असता गल्लोगल्ली या नोटीस वाटण्याचे कार्यक्रम सुरू असल्याचे दिसते त्यामुळे अशिक्षित सामान्य आणि सूत गिरणीत काम करणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

Kirit Somaiya
Ajit Pawar Politics : अजित पवारांनी शिवसेनेच्या 'त्या' नेत्याचा विषय चुटकीत मिटवला!

आतापर्यंत १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन वकील देखील आहेत. शहरातील काही नागरिकांना फारसे लिहिता वाचता येत नसल्याने बहुतांशी कामे तहसीलदार कार्यालयातील एजंटकडून केले जातात. या एजंटने पैशाच्या मोहातून जन्म दाखले मिळवून देण्याचे प्रकार केले आहेत. ०१ जानेवारी ते ३० जून या कालावधीत २५३ जणांना जन्म दाखले देण्यात आले होते मात्र ०१ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही संख्या अडीच हजार आहे.

यामध्ये अनेक दाखल्यांबाबत पुरावे देताना त्रुटी आहेत. त्यामुळे देण्यात आलेले जन्म दाखले बरोबर की चूक हा तांत्रिक मुद्दा तपासाचा भाग बनला आहे. त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांचा शोध आता जन्मतारखेचा दाखला यावर केंद्रित झाला आहे. त्यात अनेक हिंदू नागरिकांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. परिणामी नागरिक संतापले आहेत. आम्ही देखील बांगलादेशी आहोत का? असा संतप्त प्रश्न ते करीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी निर्माण केलेल्या भीतीदायक वातावरणाची झळ येथील राजकारणालाही बसली आहे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांच्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Kirit Somaiya
Nashik Cyber Fraud : बापरे, सायबर भामट्यांनी लुटले नाशिककरांचे 55 कोटी!

या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) माजी आमदार असिफ शेख आणि समाजवादी पक्षाचे मुस्ताक डिग्निटी यांचे राजकारण मात्र चमकले आहे. सध्या नागरिकांमध्ये त्यांची चर्चा आहे. एकंदरच शहरात घरोघरी येणाऱ्या नोटीस आणि त्याला उत्तर देण्याबाबत अशिक्षित आणि असमंजस नागरिक त्रस्त झालेले दिसतात त्यातून,

सीने मे जलन आखो मे तुफान सा क्यू है|

इस शहर में हर शख्स परेशान हा क्यूँ है|

याची अनुभूती येऊ लागली आहे. शेवटी एखाद्या राजकीय पक्षाचे राजकारण एखाद्या शहरासाठी किती त्रासदायक होऊ शकते याचे हे उदाहरण म्हणता येईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com