Kim Jong Un : हुकूमशाहाने 30 सरकारी अधिकाऱ्यांना लटकवले फासावर; कारण वाचून बसेल धक्का...

North Korea Flood Situation hanged 30 Officers : उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्याकडून यापूर्वीही कठोर शिक्षा दिल्याचे सांगितले जाते.
Kim Jong Un
Kim Jong UnSarkarnama
Published on
Updated on

North Korea : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन पुन्हा एकदा आपल्या कठोर शिक्षेने चर्चेत आले आहेत. चुकीला माफी न देणारे किम जोंग यांनी अनेकदा मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. यावेळी त्यांनी थेट 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकवले आहे.

फाशीच्या शिक्षेचे कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियावर पूराचे संकट कोसळले होते. यामध्ये सुमारे 4 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावरून उत्तर कोरियाचे सुप्रिमो किम जोंग संबंधित भागातील सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले होते.

Kim Jong Un
Rahul Gandhi : हरियाणात राहुल गांधींनी टाकला मोठा डाव; दोन पहिलवान दाखवणार भाजपला अस्मान?

चोसून टीव्ही या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, पुराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे आदेश किम जोंग यांनी दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस 30 अधिकाऱ्यांना फाशी देण्यात आली. अधिकाऱ्यांनी नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

उत्तर कोरियातील चांगांग प्रांताला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता. या प्रांताचे पार्टी कमिटीचे सचिव कांग बोंग-हून यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. या भागात जुलै महिन्यात पुराचा फटका बसला होता. तसेच भुस्खलनही झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. सुरूवातीला मृतांचा आकडा एक हजार सांगितला होता. पण नंतर हा आकडा 4 हजारांचा पुढे गेला.

Kim Jong Un
Congress News : गांधी घराण्याशी निष्ठेचे फळ; महाराष्ट्रातील महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

मृतांची संख्या वाढल्याने किम जोंग भडकल्याचे सांगितले जाते. त्यांनी या भागाला भेटही दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या भागातील जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पुराचा फटका बसलेल्या 15 हजारांहून अधिक नागरिकांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, दक्षिण कोरियाने मृतांचा आकडा जास्त नसल्याचा दावा केला आहे. उत्तर कोरियाकडून देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्यासाठी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com